कागल येथील एकाची ३७ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:27 AM2021-07-30T04:27:30+5:302021-07-30T04:27:30+5:30

फ्रॅक जॅकसन आणि युसूफ साकीब अशी आरोपीची नावे असून सतीश सखाराम निकम (वय ४२) रा. शाहू वसाहत कागल असे ...

Fraud of Rs 37 lakh from one in Kagal | कागल येथील एकाची ३७ लाखांची फसवणूक

कागल येथील एकाची ३७ लाखांची फसवणूक

Next

फ्रॅक जॅकसन आणि युसूफ साकीब अशी आरोपीची नावे असून सतीश सखाराम निकम (वय ४२) रा. शाहू वसाहत कागल असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहा जानेवारी ते एकवीस एप्रिल २०२१ या कालावधीत ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून ही फसवणूक झाली आहे.

कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फेसबुकच्या माध्यमातून जॅकसन यांने सतीश निकम यांच्याशी ओळख करून घेतली. युके मधील बँकेत भरत निकम नावाच्या व्यक्तीचे खाते असून खात्यावर पाच कोटी रुपये आहेत. २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले आहे. आमची बँक भारतातील निकम नावाच्या त्यांचे नातेवाइकांना शोधत आहे. जेणे करून हे पैसे त्यांच्या नातेवाइकाकडे देता येतील. असे सांगून परिचय वाढविला आणि वेगवेगळे चार्जेस, फी, सुरक्षा फी, असे सांगून ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून सतीश निकम यांच्याकडून एकूण ३७ लाख ५५ हजार रुपये काढून घेतले. पुन्हा एक कोटीं रुपयांची मागणी केल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सतीश निकम यांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेतली.

चौकट

● एटीएम कार्डही पाठविले

संशयित गुन्हेगारांनी सतीश निकम यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बँकेचा इमेल, पाच कोटी शिल्लक असलेल्या भरत निकमचे खाते, पासबुक, तसेच हे पैसे घेण्यासाठी बारक्लायेज बँकेचे एटीएम कार्डही कुरियरद्वारे पाठविले. गूगल पे, मनी ट्रान्स्फरद्वारे ही रक्कम घेण्यात आली आहे.

● फोन नंबर भारतीयच

निकम यांनी घर गहाण व हात उसन्या रक्कमा घेऊन हे पैसे दिल्याचे समजते. विशेष म्हणजे त्यांना येणारे फोन नंबर भारतीयच असून नोएडा दिल्ली परिसरातील हे गुन्हेगार असतील असा पोलिसांचा कायास आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे करीत आहेत.

Web Title: Fraud of Rs 37 lakh from one in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.