शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: गाड्या भाड्याने लावतो म्हणून अकरा लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:42 IST

सुरुवातीचे दोन महिने ऑनलाइन भाडेही पाठवले. त्यानंतर भाडे पाठवणे बंद झाले व संपर्कही बंद केला

चंदगड : गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून ११ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी मजरे शिरगाव येथील एकासह दोघांवर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दयानंद पुंडलिक मुळीक (रा. मजरे शिरगाव, ता. चंदगड) व अस्लम अमीन मुलानी (रा. जुनोनी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मुळीक याने मुलाणी यांच्या संगनमताने हिंडाल्को कंपनीकडे गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून चार गाड्या आणल्या. सुरुवातीचे दोन महिने त्यांना ऑनलाइन भाडेही पाठवले. त्यानंतर भाडे पाठवणे बंद झाले व संपर्कही बंद केला. त्यामुळे गाडी मालकांना संशय आल्यानंतर त्यांनी जीपीएसद्वारे आपल्या गाड्यांची माहिती घेतली. फसवणूक झाल्याचे कळल्यावर पोलिसांत फिर्याद दिली. मुळीक यांनी या चारही गाड्या बेळगाव येथील सावकार सुभाष डे व परभणी जिल्ह्यातील सेलगाव येथील नागनाथ विटकर व नायरकर यांच्याकडे गहाण ठेवून आठ लाख रुपये उचलले. या सर्व गाड्यांचे तीन महिन्यांचे तीन लाख रुपये भाडेही थकवले. सर्व मिळून ११ लाख रुपयांची फसवणूक केली. शकील अरीफ काझी रा. राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांनी चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाने सहायक पोलिस निरीक्षक विजय कोळेकर तपास करीत आहेत.प्रकरणे बाहेर पडणार फसवणूक झालेल्या गाड्यांचा शोध घेताना त्यातील एक गाडी दारू तस्करीमध्ये पकडल्याने जीपीएसद्वारे चंदगड पोलिस ठाण्यात ती आढळून आली. त्यानंतर अधिक तपास केला असता इतर गाड्यांचा उलगडा झाला. यामुळे यातून अजूनही काही प्रकरणे बाहेर पडण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Rental car fraud of eleven lakhs, two booked.

Web Summary : Two individuals booked in Chandgad for ₹11 lakh rental car fraud. Accused took cars, initially paid rent, then stopped, pawning them. Victims discovered the fraud via GPS, leading to a police complaint and further investigation.