चौकटी (विरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:43+5:302020-12-09T04:19:43+5:30
सभेत निवड झालेली नवीन कार्यकारिणी सुरेश संकपाळ (अध्यक्ष), बाबासाहेब बुगडे, मिलिंद पांगिरेकर (उपाध्यक्ष), दत्ता पाटील (सचिव), अजित रणदिवे (सहसचिव), ...

चौकटी (विरोध झुगारून नवी कार्यकारिणी मंजूर)
सभेत निवड झालेली नवीन कार्यकारिणी
सुरेश संकपाळ (अध्यक्ष), बाबासाहेब बुगडे, मिलिंद पांगिरेकर (उपाध्यक्ष), दत्ता पाटील (सचिव), अजित रणदिवे (सहसचिव), नंदकुमार गाडेकर (खजानिस), इरफान अन्सारी (लोकल ऑडिटर), अनिता नवाळे, सारिका यादव, संजय देवेकर, गुलाब पाटील, संजय भांदुगरे, बबन इंदुलकर, एम. एस. मोरस्कर, सुरेश उगारे, पी. व्ही. पाटील, एस. आर. पाटील, सखाराम चौकेकर, श्रीकांत पाटील, प्रकाश पोवार, एस. एस. चव्हाण, श्रीशैल्य मठपती, जितेंद्र म्हैशाळे, सागर चुडाप्पा, रवींद्र मोरे, जनार्दन दिंडे, अशोक पाटील, बी. सी. वस्त्रद (संचालक).
चौकट
पहिल्यांदाच ४९८ सदस्यांची उपस्थिती
संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक सभेसाठी ७६७ पैकी ४९८ सदस्य उपस्थित राहिले. महिला सदस्यांचा सहभाग लक्षवेधी होता. लोकशाही पद्धतीने झालेल्या कार्यकारिणीच्या निवडीस बहुसंख्य सदस्यांनी हात उंचावून आवाजी मतदान केले. या सभेत हतबल झालेल्या मूठभर सभासद विरोधकांनी सभेत गोंधळ घालण्याचा केवीलवाणा प्रयत्न केल्याचे संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी सांगितले.
सभेतील क्षणचित्रे
अनेक सभासदांना मास्कचा विसर, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सोमवारी रात्री उशिरापर्यंत सत्तारूढ आणि विरोधी गटात झालेल्या वाटाघाटी ठरल्या निष्फळ
सत्ताधारी गटाचे समर्थक सकाळी दहा वाजल्यापासूनच सभागृहात उपस्थित