फणस, जांभूळ, करवंदांचा दरवळला सुगंध

By Admin | Updated: April 13, 2015 00:03 IST2015-04-12T23:01:12+5:302015-04-13T00:03:37+5:30

आठवडी बाजार : तीव्र उन्हामुळे लिंबू, काकडी महाग, आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण; वळवामुळे द्राक्षे महाग

Fragrance, jambul | फणस, जांभूळ, करवंदांचा दरवळला सुगंध

फणस, जांभूळ, करवंदांचा दरवळला सुगंध

कोल्हापूर : वाढणाऱ्या उष्म्यामुळे ग्राहकांकडून रविवारी बाजारात लिंबू व काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागली आहे. एका लिंबूचा दर पाच रुपयांच्या घरात गेला आहे. काकडीचा दर ३० रुपयांवरून ४० रुपये प्रतिकिलो झाला आहे. दुुसरीकडे भाज्यांची आवक जास्त असल्याने दरात घसरण झाली आहे. धान्यांच्या दरात चार रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.शहरातील बाजारात भाज्यांची आवक जास्त प्रमाणात आली आहे. त्यामुळे सरासरी दर निम्म्यापेक्षा कमी झाले आहेत. मात्र, शनिवारी (दि. ११) झालेला वळीव पाऊस व ढगाळ वातावरणामुळे या भाजीपाल्यांच्या दरात किंचित वाढ झाली आहे. गवारीचा दर शंभर रुपयांवरून ५० रुपये, दोडका ६० वरून ३० रुपये, तर वांगी ४० वरून २० रुपयांवर आले आहेत. पाच रुपयाला एक मोठा लिंबू, तर लहान तीन लिंबू दहा रुपयांना होते. कांदा, बटाटा व लसूण यांचे दर स्थिर आहेत. कांदा १२ रुपये प्रतिकिलो, बटाटा नऊ, तर लसूण ३० रुपये आहे. कोबी, घेवडा व मेथीमध्ये वाढ झाली आहे. कोबी सात रुपये, घेवडा ३८ रुपये, मेथीची पेंढी ११ रुपये झाली आहे. मेथीमध्ये एक रुपयाने वाढ झाली आहे. त्याचबरोबर गहू, मूगडाळ, मूग, सरकी, तूरडाळ, मटकी यामध्ये वाढ झाली आहे. गहू २६ वरून ३० रुपये, मूगडाळ १२० वरून १२४ रुपये, मूग ९६ वरून १०४ रुपये, मटकी ८० रुपयांवरून ९८ झाली आहे. तब्बल प्रतिकिलो दरामागे १८ रुपयांची वाढ झाली आहे. तूरडाळ ९६ वरून १०४ रुपये, सरकी ६६ वरून ६८ रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
वळीवचा फटका; द्राक्षे वाढले
तासगाव येथून आलेल्या द्राक्षांचे दर २० रुपयांनी वाढले आहेत. द्राक्षे आता ८० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला वळीव पाऊस व द्राक्षांची झालेल्या कमी आवकेचा परिणाम दरामध्ये झाला असल्याचे द्राक्षे विक्रेत्यांनी सांगितले.

फणसाचे गरे २५ रुपये पावशेर
फणस दीडशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत आहेत, तर फणसाचे गरे २५ रुपये पावशेर आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात रानमेवा आला आहे. जांभळे ८० रुपये, तर करवंदे ५० रुपये प्रतिकिलो होती. जंगलचा रानमेवा बाजारात विक्रीस आला असला तरी तुरळक प्रमाणातच दिसत होता.

फळांचा राजावर एक नजर
आंबाआवकदर (रु.)
हापूस६९५ पेटी७००
पायरी६० बॉक्स८००
रायवळ१२५ पेटी२००
तोतापुरी३ टन२५ हजार

Web Title: Fragrance, jambul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.