शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
3
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
4
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
5
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
6
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
7
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
8
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
9
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
10
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
11
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
12
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
13
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
14
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
15
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
16
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
17
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
19
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
20
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”

चौथरा जाग्यावर; टाकी गायब

By admin | Updated: January 29, 2015 00:32 IST

सातवे नळपाणी योजनेत गैरकारभार : कोटींवर खर्च करून शिंदेवाडी, वाळकेवाडीत पाणीटंचाई

पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील जलस्वराज्य योजनेंतर्गत असलेल्या पाणीपुरवठा योजनेत गैरकारभार झाल्याने ८ जानेवारी रोजी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकासह १२ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. या योजनेत ‘ढपला’ कुणी, किती मारला याची चर्चा आता सुरू आहे. राजकीय वरदहस्त, अधिकाऱ्यांचे संगनमत यामुळे तक्रारीनंतर थेट कारवाईकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष, तपासणीत निदर्शनास आलेला गैरकारभार, झालेली कारवाई यांवर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून... 

भीमगोंडा देसाई - कोल्हापूरजलस्वराज्य योजनेंतर्गत सातवे (ता. पन्हाळा) येथील नळपाणी पुरवठा योजनेतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला असून ढपलामारीची चर्चा सुरू झाली आहे. वाळकेवाडीत चौथरा बांधला आहे; मात्र पाण्याची टाकी गायब आहे. तत्कालीन ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण पाणी’ मुरविले, हे चौकशीत उघड झाले आहे. जागतीक बँकेच्या अर्थसाहाय्याने सातवे गावासाठी सन २००६-०७ साली जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख रुपये मंजूर झाले. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा, महिला सबलीकरण, सामाजिक लेखापरीक्षण या समितीतर्फे योजनेची अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणीही संकलित केली. कामाचा ठेका कऱ्हाडचे रामचंद्र पोवार यांनी घेतला. ठेका घेतल्यानंतर दोन महिन्यांनी रामचंद्र यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ठेकेदारी सांभाळत कारभाऱ्यांनी योजना पूर्ण केली. योजनेसाठी गावसभा होऊन निर्णय होणे अपेक्षित असताना गावसभा कागदावर राहिली आणि कारभाऱ्यांनी डल्ला मारला. त्यामुळे योजनेत त्रुटी राहिल्या.वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली. कारवाईसाठी वेळोवळी वरिष्ठांकडेही साकडे घातले. २५ फेब्रुवारी २०१३ रोजी उत्तम यांनी पुणे विभागाचे आयुक्त यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले. सातवे ग्रामपंचायत हद्दीतील वाळकेवाडी, शिंदेवाडीला योजना सुरू झाल्यापासून पाणीपुरवठा झालेला नाही. काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. योजनेसंबंधी कागदपत्रे ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाहीत. लोकवर्गणीची खोटी आणि बोगस नावे दाखविली आहेत. पावत्या दिलेल्या नाहीत. वाड्या-वस्तीला पाणी पोहोचले नसताही योजनेचे अंतिम बिल काढले आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झालेला आहे. याची खातेनिहाय सखोल चौकशी करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले. तरीही थेट कारवाई न झाल्याने त्यांनी वारंवार चिकाटीने पाठपुरावा सुरूच ठेवला. उत्तम यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी उपोषणाचा इशारा देऊन जोरदार रेटा लावला. परिणामी, प्रकरण आता शेकणार म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे धाडस केले. पन्हाळा पंचायत समितीच्या सौ. एन. आर. परीट, शाहूवाडी-पन्हाळ्याचे उपअभियंता जगदीश काटकर यांनी चौकशी केली. यात योजना पूर्ण झाल्यानंतरही बाळकेवाडी, शिंदेवाडी येथील सर्व रहिवाशांना पाणी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (क्रमश:) तीन वर्षांपूर्वी तक्रारग्रामसभेत वेळोवेळी निर्णय घेऊन पारदर्शकपणे अंमलबजावणी अपेक्षित होते; परंतु, गावसभा कागदावर आणि कारभारी शिरजोर होऊन डल्ला मारला. त्यामुळे योजनेत अनेक त्रुटी राहिल्या. वाड्या, वस्त्यांमध्ये पाणी जाऊन पडले नाही; त्यामुळे कोटींपेक्षा अधिक खर्च झालेला पैसा मुरल्याची शंका येऊ लागली. त्यातूनच रहिवासी उत्तम रंगराव नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी पहिली तक्रार केली.