चतुर्थ वार्षिक आकारणी मोजणीचे काम सुरू; दोन टप्प्यांत होणार मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST2021-06-09T04:29:44+5:302021-06-09T04:29:44+5:30
पालिका शहर व वाढीव हद्दीतील मिळकतधारकांकडून चतुर्थ वार्षिक करआकारणी केली जाते. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे करआकारणी मोजणीचे काम लांबणीवर पडले ...

चतुर्थ वार्षिक आकारणी मोजणीचे काम सुरू; दोन टप्प्यांत होणार मोजणी
पालिका शहर व वाढीव हद्दीतील मिळकतधारकांकडून चतुर्थ वार्षिक करआकारणी केली जाते. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे करआकारणी मोजणीचे काम लांबणीवर पडले होते. त्यामुळे सन २०२१-२२ सालासाठी करआकारणी मोजणी करण्यात येत आहे. पालिकेचे एकूण २६ वॉर्ड असून, पहिल्या टप्प्यात १ ते १३ आणि दुसऱ्या टप्प्यात १४ ते २६ वॉर्डांतील मिळकतींची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय नियंत्रण विभागीय अधिकारी त्याचबरोबर मोजणी कर्मचारी व सहायक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून, त्यांना आज, बुधवारी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दरम्यान, मोजणी कामासाठी नियुक्ती करताना त्यामध्ये दुजाभाव केल्याबद्दल काही कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. वर्षभर करवसुली कामात नेमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या मोजणी कामासाठी नियुक्ती न करता मर्जीतील विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याचे नेमके गौडबंगाल काय, असा सवाल खुद्द पालिका वर्तुळातूनच उपस्थित केला जात आहे.