शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

किटवाड धरणात बुडून चार तरुणींचा मृत्यू, एकीला वाचविण्यात यश, कोल्हापुरातील चंदगड येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 16:15 IST

बचावलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर

निंगाप्पा बोकडेचंदगड : बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आले. ही दुर्घटना आज, शनिवार (दि. २६) सकाळच्या सुमारास घडली. याघटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.आशिया मुजावर (वय-१७, रा. उज्ज्वलनगर), कुडशिया हासम पटेल (२०), रुक्शार भिस्ती (२०, दोघी रा. अनगोळ) व तस्मिया (२०, रा. झटपट कॉलनी) अशी मृत्यू तरुणींची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, किटवाड येथे दोन धरणे आहेत. यातील एका धरणावर धबधब्याचे पाणी पडून तयार झालेल्या  खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पाचही तरुणी पाण्यात बुडाल्या. यामधील चार जणींचा जागीच मृत्यू झाला. तर एकीला वाजवण्यात यश आले. बचावलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, तातडीने किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील तरुणांनी धाव घेऊन पाण्याच्या खड्ड्यातून पाचही तरुणींना बाहेर काढले. शनिवारी सकाळीच बेळगाव येथील अनेक कुटुंबे मिळून असे चाळीस जण धरणाच्या ठिकाणी सहलीसाठी आले होते. त्यावेळी ही घटना घडल्याने बघता बघता परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणे