शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
2
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
3
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
4
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
5
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
6
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
7
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
8
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
9
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
10
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
11
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
12
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
13
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
14
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
15
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
16
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड
17
शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
18
मम्मी... मम्मी...! नदीमध्ये रील बनवण्याची 'नशा' जिवावर बेतली, पाय घसरून महिला गंगेत बुडाली; Video Viral
19
"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट
20
'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

Kolhapur Crime: टॉवर चोरीच्या वादातून पैलवानाच्या खुनाचा प्रयत्न; चौघांना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:36 IST

पुराव्यांअभावी एकाची सुटका

कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली येथे शेतातील मोबाइल टॉवरचे अँगल चोरल्याच्या आरोपातून पैलवान संजय राजाराम जाधव (वय ३५) याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना जन्मठेप आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. गुरुवारी (दि. २७) झालेल्या सुनावणीत पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांनी शिक्षा सुनावली.

भरत भीमराव पाटील (२७), दीपक बाळासो इथापे (३३), मयूर महादेव सावंत (२६) आणि विजय बाळू साखरे (२९, चौघे रा. सोंडोली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश पाटील याची सबळ पुराव्यांअभावी सुटका झाली.सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोंडोली येथे पैलवान संजय जाधव यांच्या शेतात मोबाइल कंपनीचा टॉवर उभा करण्याचे काम सुरू होते. ऑगस्ट २०१८ मध्ये टॉवरचे अँगल चोरीला गेले. संशयित भरत पाटील आणि त्याच्या मित्रांनी अँगल चोरल्याची माहिती पैलवान संजय याला मिळाली होती. त्यानुसार १९ ऑगस्ट २०१८ रोजी संजय याने भरत पाटील आणि त्याच्या मित्रांना विचारणा केली. त्यावेळी सर्व संशयितांनी चोरीची कबुली देऊन अँगल परत देतो असे सांगितले. मात्र, त्याच दिवशी पाच जण संजयच्या घरात घुसले. आमच्यावर चोरीचा आळ घेतोस काय? असे म्हणत भरत पाटील याने संजयवर चाकूने हल्ला चढवला.संजयची मोठी बहीण लक्ष्मी जाधव यांनी आरडाओरडा केल्याने गल्लीतील लोकांनी येऊन जखमी संजयला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडवले. चारही हल्लेखोर पळून गेले. याबाबत लक्ष्मी जाधव यांच्या फिर्यादीनुसार शाहूवाडी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एम. व्ही. जठार यांनी तपास केला.१२ साक्षीदार तपासलेसरकारी वकील मंजूषा पाटील यांनी न्यायालयात १२ साक्षीदार तपासले. फिर्यादी लक्ष्मी जाधव, प्रत्यक्षदर्शी निवृत्ती सावंत, महेंद्र चोरगे, विवेक पाटील यांच्यासह जप्ती पंच बाबूराव डिगे, वैद्यकीय अधिकारी संकेत प्रभुणे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांच्या साक्षी आणि ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी चौघांना दोषी ठरवत जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

आवाज गेला, दृष्टी अधू झालीसंजय जाधव हा नामांकित पैलवान होता. हल्ल्यात त्याच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याने आवाज क्षीण झाला. डोळ्याला दुखापत झाल्याने स्पष्ट दिसत नाही. अजूनही त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यात त्याचे कुस्तीचे करिअर उद्ध्वस्त झाल्यामुळे न्यायाधीशांनी हल्लेखोरांंना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय