अल्पवयीन मुलीवर चौघांचा बलात्कार

By Admin | Updated: July 8, 2014 00:59 IST2014-07-08T00:58:28+5:302014-07-08T00:59:42+5:30

कुरुकलीतील घटना : संशयित करवीर पोलिसांच्या ताब्यात

Four rapes of a minor girl | अल्पवयीन मुलीवर चौघांचा बलात्कार

अल्पवयीन मुलीवर चौघांचा बलात्कार

कोल्हापूर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून कुरुकली (ता.करवीर) येथील एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर प्रियकरासह इतर तिघांनी वेळोवेळी बलात्कार केल्याचे आज, सोमवारी उघडकीस आले. संबंधित मुलीने तक्रार दिल्यानंतर रात्री करवीर पोलिसांनी संशयित पंकज मधुकर पाटील, सरदार बळवंत पाटील, सागर कृष्णा पाटील व कुमार (पूर्ण नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुरुकली) अशा चौघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पंकज पाटील याचे गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यातून पंकजनेअनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याची माहिती गावातीलच पंकजचे मित्र सरदार, सागर व कुमार या तिघांना समजली. या मित्रांनी आमचीही त्या मुलीशी भेट घडवून दे नाहीतर तुमचे संबंध गावभर करू, अशी धमकी दिली.
घडला प्रकार पंकजने प्रेयसीला सांगितला. त्या मित्रांची शरीरसुखाची मागणी मान्य न केल्यास गावभर आपली बदनामी होईल. तू त्यांची मागणी मान्य कर. त्यानंतर त्या चौघांनी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. अखेर मुलीने हा प्रकार नातेवाईकांच्या कानावर घातला.मुलीने करवीर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौघांना सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four rapes of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.