कुरुंदवाडमध्ये चार पोलिसांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:12+5:302021-06-16T04:34:12+5:30

कुरुंदवाड : शहरातील कोरोना संसर्ग कमी होत असताना संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर पहारा करणारे येथील पोलीस ठाण्यातील चार पोलीस ...

Four policemen were infected with corona in Kurundwad | कुरुंदवाडमध्ये चार पोलिसांना कोरोनाची लागण

कुरुंदवाडमध्ये चार पोलिसांना कोरोनाची लागण

कुरुंदवाड : शहरातील कोरोना संसर्ग कमी होत असताना संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर पहारा करणारे येथील पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुळातच पोलिसांची संख्या कमी असताना, पोलीस ठाण्यांतर्गत २७ गावात बंदोबस्त राखताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच चार पोलिसांना संसर्गाची लागण झाल्याने पोलिसांत भीती व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन, आरोग्य विभागासह पोलीस यंत्रणा सक्रिय आहे. लॉकडाऊन नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा कडक कारवाईची भूमिका घेतल्याने शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊन संसर्ग नियंत्रणात आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासह शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकत असतानाच येथील पोलीस ठाण्यातील चार पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या कोरोना योध्द्यांवरच कोरोनाचे संकट आल्याने पोलीस प्रशासनात भीती निर्माण झाली आहे.

Web Title: Four policemen were infected with corona in Kurundwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.