कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतींतील पाचपैकी चौघेजण शास्त्र शाखेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 03:08 PM2020-10-03T15:08:15+5:302020-10-03T15:42:32+5:30

science department, kolhapur news, shivaji university शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी निवडलेले पाचपैकी चार उमेदवार हे शास्त्र (विज्ञान) विद्याशाखेतील आहेत. त्यात डॉ. डी. टी. शिर्के, के. व्ही. काळे, नितीन देसाई, अविनाश कुंभार यांचा समावेश आहे.

Four out of five finalist interviews will be in the science department | कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतींतील पाचपैकी चौघेजण शास्त्र शाखेतील

कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतींतील पाचपैकी चौघेजण शास्त्र शाखेतील

Next
ठळक मुद्देकुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतींतील पाचपैकी चौघेजण शास्त्र शाखेतील सामाजिक शास्त्रातील एक उमेदवार : शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव

संतोष मिठारी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखतीच्या प्रक्रियेसाठी निवडलेले पाचपैकी चार उमेदवार हे शास्त्र (विज्ञान) विद्याशाखेतील आहेत. त्यात डॉ. डी. टी. शिर्के, के. व्ही. काळे, नितीन देसाई, अविनाश कुंभार यांचा समावेश आहे.

डॉ. अंजली कुरणे या सामाजिक शास्त्र विद्याशाखेमधील आहेत. या उमेदवारांना शिक्षणासह प्रशासकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अंतिम मुलाखती सोमवारी (दि. ५) होणार आहेत.

१) डॉ. दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के
मूळ गाव - वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले. जि. कोल्हापूर)
जन्मतारीख - ११ जून १९६५
शिक्षण- एम. एस्सी. (संख्याशास्त्र), एम. फिल., पीएच. डी.
सध्या कार्यरत- शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक
विविध पदांवर काम- प्र-कुलगुरू, कुलसचिव, संख्याशास्त्र विभागप्रमुख, अधिसभेसह विविध अधिकार मंडळांवर काम. शिक्षणक्षेत्रातील अनुभव- ३३ वर्षे
कुलगुरुपदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांमध्ये निवड- पहिल्यांदा


२) डॉ. नितीन शिवाजीराव देसाई
मूळ गाव- तळेवाडी (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर)
जन्मतारीख- १३ जून १९६९
शिक्षण- एम. एस्सी., पीएच. डी. (सायकोजेनेटिक)
सध्या कार्यरत- मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधील विज्ञानशाखेचे अधिष्ठाता
विविध पदांवर काम- परीक्षा नियंत्रक (अमेठी युनिव्हर्सिटी), विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता (डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई). शिक्षणक्षेत्रातील अनुभव- २८ वर्षे
कुलगुरुपदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांमध्ये निवड- दुसऱ्यांदा

३) डॉ. कारभारी विश्वनाथ तथा के. व्ही. काळे
मूळ गाव- सालुखेडा (जि. औरंगाबाद)
जन्मतारीख- १८ जून १९६२
शिक्षण- एम. एस्सी., एमसीए,, पीएच. डी. (इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी)
सध्या कार्यरत- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक
विविध पदांवर काम - प्रभारी कुलगुरू आणि कुलसचिव, बीसीयूडी संचालक, विभागप्रमुख, विविध अधिकार मंडळांवर काम. शिक्षणक्षेत्रातील अनुभव- ३२ वर्षे.
कुलगुरुपदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांमध्ये निवड- चौथ्या वेळी

५) डॉ. अंजली दिनकर कुरणे
मूळ गाव- शिवाजी पेठ, कोल्हापूर, सध्या - पुणे
जन्मतारीख -२५ नोव्हेंबर १९६४
शिक्षण- बी. एस्सी. (प्राणिशास्त्र), एम. एस्सी. आणि पीएच. डी. (मानवशास्त्र, सामाजिकशास्त्रे)
सध्या कार्यरत- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता, मानवशास्त्र तज्ज्ञ.
विविध पदांवर काम- मानवशास्त्र विभागप्रमुख, इंटरडिसिप्लिनरी स्कूलच्या संचालक, सामाजिकशास्त्रे आणि मानवविद्या केंद्राच्या समन्वयक. शिक्षणक्षेत्रातील अऩुभव-२९ वर्षे
कुलगुरुपदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांमध्ये निवड- पहिल्यांदा

५) डॉ. अविनाश शंकर कुंभार
मूळ गाव- इस्लामपूर (जि. सांगली)
जन्मतारीख- १५ एप्रिल १९६५
शिक्षण- बी. एस्सी., एम. एस्सी., पीएच. डी. (रसायनशास्त्र)
सध्या कार्यरत- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक.
विविध पदांवर काम- रसायनशास्त्राच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष. अद्ययावत उपकरणे केंद्राचे संचालक. इंटरडिसिप्लिनरी स्कूल अँड सायन्सचे प्रमुख. शिक्षण क्षेत्रातील अनुभव-३० वर्षे.
कुलगुरुपदासाठीच्या अंतिम पाच उमेदवारांमध्ये निवड-पहिल्यांदा
 

विज्ञान शाखेशी संबंधित सहा कुलगुरू

विज्ञान विद्याशाखेतील प्रा. के. बी. पवार यांची १९८६ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सहा कुलगुरूंपैकी प्रा. के. बी. पवार, डॉ. ए. टी. वरुटे, एम. जी. ताकवले, माणिकराव साळुंखे, एन. जे. पवार, देवानंद शिंदे हे कुलगुरू विज्ञान शाखेशी संबंधित होते.

Web Title: Four out of five finalist interviews will be in the science department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.