शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या तीन दिवसांत चार लाख भाविक अंबाबाईचरणी; शुक्रवार ते रविवारी उच्चांकाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:26 IST

पर्यटन, खरेदीने बाजारपेठेत उत्साह 

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तीन दिवसांत ४ लाख २१ हजार ८३० भाविकांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. बुधवारी रात्री देवीची पालखी मोर आकारात काढण्यात आली. शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. परस्थ भाविकांचे शहरातील पर्यटन आणि खरेदीमुळे कोल्हापुरातील बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे.नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक येतात. सोमवारपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला आहे, तेव्हापासून मागील तीन दिवसांत सव्वाचार लाख भाविक अंबाबाईचरणी लीन झाले. बुधवारीही अंबाबाई मंदिराचा आवार भाविकांनी फुलून गेला होता. अंबाबाईच्या दर्शनानंतर भाविक जवळच तुळजाभवानी देवीचे दर्शन घेत आहेत.यानंतर, त्यांची पावले वळतात ती महाद्वार रोड, जोतिबा रोडवर. महाद्वार बाजारपेठ म्हणजे स्वस्त आणि मस्त खरेदी. येथे भाविक कपडे, नऊवारी साड्या, महाराष्ट्रीयन पद्धतीच्या साड्या, कोल्हापुरी साज, ठुशी, लक्ष्मीहार अशा इमिटेशन ज्वेलरीसह कोल्हापुरी चप्पलची खरेदी करत आहेत, तसेच शहरातील न्यू पॅलेस, रंकाळा, टाऊन हॉल म्युझिअम अशा पर्यटन स्थळांना भेटी देत आहेत.

साउंड सीस्टिमवरून पूजेची माहितीनवरात्रौत्सवात अंबाबाईची रोज वेगवेगळ्या देवीच्या रूपात पूजा बांधली जात आहे. देवीचे हे नेमके कोणते रूप आहे, मूर्ती कशी आहे, देवीच्या या स्वरूपामागील पौराणिक संदर्भ, तिची उपासना केल्यानंतर होणारा लाभ, अशी सर्वंकष माहिती मंदिर परिसरातील हेरिटेज म्युझिकल पोलवरून सांगितली जात आहे. अंबाबाई मंदिर, बिंदू चौक, खासबाग, महाद्वार, गुजरी या परिसरात हे १२० खांब असून, त्यावर सकाळपासून देवीचे मंत्रोच्चार, गाणी व अंबाबाईची पूजा बांधल्यानंतर पूजेची माहिती सांगितली जात आहे. श्रीपूजक मंडळातर्फे याची ऑडिओ क्लिप बनविण्यात आली आहे.

भाविक संख्या

  • सोमवार : १ लाख १८ हजार ४१७
  • मंगळवार : १ लाख ७८ हजार २०७
  • बुधवार : १ लाख २५ हजार २०६
  • एकूण : ४ लाख २१ हजार ८३०
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Lakhs throng Ambabai temple during Navratri; peak expected weekend.

Web Summary : Over 4.2 lakh devotees visited Ambabai temple in three Navratri days. Crowds expected to peak this weekend. Kolhapur's market thrives from tourist shopping.