‘गडहिंग्लज’ला तीन दशकांत चार पोटनिवडणुका

By Admin | Updated: July 7, 2016 00:50 IST2016-07-06T22:50:25+5:302016-07-07T00:50:46+5:30

नगरपालिका निवडणूक : तीनदा जनता आघाडीची, तर एकदा जनता दल-जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजी

Four gang-plagues in three decades of 'Gadhinglj' | ‘गडहिंग्लज’ला तीन दशकांत चार पोटनिवडणुका

‘गडहिंग्लज’ला तीन दशकांत चार पोटनिवडणुका

राम मगदूम -- गडहिंग्लज --गेल्या तीन दशकांत गडहिंग्लज नगरपालिकेच्या चार पोटनिवडणुका झाल्या. त्यापैकी तीन निवडणुकीवेळी जनता आघाडी, तर एका निवडणुकीत काँगे्रसप्रणित सर्वपक्षीय शाहू आघाडी सत्तेवर होती. कारणे निरनिराळी असली तरी चारही पोटनिवडणुकीत जनता आघाडीनेच बाजी मारल्याचे दिसून येते. मात्र, यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी असल्यामुळे संभाव्य पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
१९८७ : प्रभाग (२१) : जनता आघाडीचे नगराध्यक्ष दादा पेडणेकर यांनी आघाडीचे नगरसेवक अविनाश अलूरकर यांचा ‘तथाकथित’ राजीनामा मंजूर केला. त्यामुळे झालेली पोटनिवडणूक जनता आघाडीच्याच आनंदराव पाटील
यांनी ४२७ मतांच्या फरकाने
जिंकली. त्यावेळी सर्वपक्षांच्या पाठिंब्यावर लढलेले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार दिलीप देसाई यांचा पराभव झाला.
१९९२ : प्रभाग (१३) : १९९१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता आघाडीच्या शंकर मदिहाळी
यांच्यावर केवळ ७ मतांनी विजय मिळविलेले काँगे्रसचे गुरूलिंग स्वामी यांचे वर्षातच आकस्मिक निधन झाले. त्यानंतर १९९२ मध्ये तिरंगी पोटनिवडणूक झाली. त्यात मदिहाळी यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी भाजपचे दिलीप बेळगुद्री यांचा १८० मतांनी पराभव केला. दुसरे प्रतिस्पर्धी काँगे्रसचे बाळ पाटील यांना ८३ मते मिळाली होती.
१९९८ : प्रभाग (१४) : १९९६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले जनता आघाडीचे किरण शिंदे
यांचा अपघाती मृत्यू झाला.
त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर लढलेले अपक्ष उमेदवार रमेश परीट यांचा जनता आघाडीच्या शिवाजीराव गवळी यांनी ५० मतांच्या फरकाने पराभव केला.
२००८ : प्रभाग (४) : २००६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसुराज्यच्या प्रेमा विटेकरी यांच्यावर १० मतांनी विजय मिळविलेल्या राष्ट्रवादीच्या रेश्मा कांबळे यांच्याविरोधात
वयाच्या अटीची पूर्तता होत नसल्याच्या कारणावरून त्यांच्या प्रतिस्पर्धी विटेकरी यांनी तक्रार
केली. त्यामुळे कांबळे यांचे नगरसेवकपद रद्द झाले. त्यानंतर
२००८ मध्ये पुन्हा त्याच दोघींत पोटनिवडणूक झाली. यामध्ये ‘जनता दल-जनसुराज्य’च्या विटेकरी यांनी १६५ मतांनी बाजी मारली.

नेत्याचा पराभव.. नैतिकता अन् टोपी !
१९८६ मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या चुकीच्या मतदानामुळे जनता आघाडीचे नेते श्रीपतराव शिंदे यांचा पराभव झाला. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून अविनाश अलूरकर यांनी नगरसेवकपदाचा बिनतारखेचा राजीनामा पक्षप्रतोद दादा पेडणेकर यांच्याकडे दिला होता. ‘तो’ राजीनामा पेडणेकरांनी नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपल्या अधिकारात परस्पर मंजूर केल्यामुळे अलूरकरांच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक झाली.

यंदाची पोटनिवडणूक का लागली ?
२०११ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ३ अ मधून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सुंदराबाई बिलावर यांनी वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाचा ‘व्हिप’ झुगारून विरोधी जनता दलाचे राजेश बोरगावे यांच्याबाजूने मतदान केले. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे.

Web Title: Four gang-plagues in three decades of 'Gadhinglj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.