कोल्हापूर : भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सवात ताराराणी विद्यापीठाचा झेंडा फडकला.कमला महाविद्यालयाची विद्यार्थिनी विद्यार्थिनी फिजा खान हिचा गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. याच गायन स्पर्धेत आरती कांबळे हिचाही द्वितीय क्रमांक आला.उषाराजे हायस्कूलची संगीत विभागाची विद्यार्थिनी दिव्या टोणपे हिचा नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. मुलींमध्ये पहिली आलेल्या दिव्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे.
कोल्हापूर जिल्हास्तरीय कला उत्सवात ताराराणी विद्यापीठाच्या चार विद्यार्थिनींचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 18:26 IST
भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सवात ताराराणी विद्यापीठाचा झेंडा फडकला.
कोल्हापूर जिल्हास्तरीय कला उत्सवात ताराराणी विद्यापीठाच्या चार विद्यार्थिनींचा झेंडा
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्हास्तरीय कला उत्सवात ताराराणी विद्यापीठाच्या चार विद्यार्थिनींचा झेंडाफिजा खान, आरती कांबळे, दिव्या टोणपे, राजस पाटील यांचे यश