शिरोळ : बेकायदेशीर शिबिराद्वारे लायसन्स काढून देण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या दोघा आरोपींना जयसिंगपूर न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जमीर सय्यद (वय २९, रा. टाकळी, ता. करमाळा, जि. सोलापूर) व प्रवीण गायकवाड (वय ३९, रा. तेरवाड, ता. शिरोळ) या आरोपींकडून अन्य गुन्हे घडले आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत. कोणत्याही चाचणीशिवाय कच्चे आणि पक्के वाहन चालविण्याचा परवाना देण्यासाठी बेकायदेशीर शिबिर घेऊन शासनाची व नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोघांचा पर्दाफाश प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने गुरुवारी केला होता.
वाचा- बोगस वाहन परवाना; पुणे व्हाया कोल्हापूर कनेक्शन, ‘एआय’द्वारेही परस्पर परवाने दिल्याची धास्तीसोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून परवाना काढण्यासाठी जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटीजवळ असणाऱ्या हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. शिबिरातून किती जणांनी नोंदणी केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे फसवणुकीची व्याप्ती किती मोठी आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.
Web Summary : Two arrested for running illegal license camp in Shirol, defrauding citizens. Accused remanded to police custody for further investigation into other crimes and the extent of the fraud involving unauthorized camps and registrations.
Web Summary : शिरोल में अवैध लाइसेंस शिविर चलाने और नागरिकों को धोखा देने के आरोप में दो गिरफ्तार। आरोपियों को अन्य अपराधों और अनधिकृत शिविरों और पंजीकरणों से जुड़े धोखाधड़ी की सीमा की आगे जांच के लिए पुलिस हिरासत में भेजा गया।