शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: २५ जुलैचा योगायोग; राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले, चार दरवाज्यातून ७२१२ क्युसेकने विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 12:24 IST

४४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने राधानगरीधरण १०० टक्के भरले आहे. सद्या धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. यातून एकूण ७२१२ क्युसेक विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.शुक्रवारी सकाळपासून पावसाचा काहीसा जोर पाहावयास मिळत आहे. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. मात्र, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, भुदरगड, पन्हाळा तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे. तसेच धरण परिसरात सोसाट्याचा वारा सुरू आहे. दिवसभरात धरणात ०.११ टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ५४.१ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला आहे. पंचगंगा नदीची पातळी २७.४ फुटांपर्यंत होती.दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील ११ मालमत्तांची पडझड होऊन २.२० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

नऊ धरणे तुडुंब..आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ धरणे तुडुंब झाली आहेत. त्यामुळे येथून विसर्गही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. कोदे, धामणी, सर्फनाला, आंबेओहोळ, जांबरे, घटप्रभा, जंगमहट्टी, चित्री, पाटगाव, कडवी ही धरणे भरली आहेत.

२५ जुलैचा योगायोग...गतवर्षीही २५ जुलै रोजी राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे उघडले होते आणि यावर्षी देखील २५ जुलैला धरण भरले आणि स्वयंचलित दरवाजे उघडले गेलेत. २० जुलैपासून सर्व्हिस गेट बंद आहेत. जवळपास एक महिन्यापासून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून नदीपात्रात रोज १५०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. जर हा विसर्ग सुरू केला नसता, तर जूनअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले असते