कोल्हापुरात चार अट्टल चेन स्नॅचरना अटक
By Admin | Updated: July 28, 2014 00:35 IST2014-07-28T00:34:56+5:302014-07-28T00:35:28+5:30
तीन लाख किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.

कोल्हापुरात चार अट्टल चेन स्नॅचरना अटक
कोल्हापूर : ‘धूम स्टाईल’ने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चौघा अट्टल चेन स्नॅचरना आज, रविवारी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख किमतीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरात ‘धूम स्टाईल’ने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार वाढल्याने महिलावर्गांत भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी चेन स्नॅचरच्या मुसक्या आवळण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. दरम्यान, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये फिर्यादी रूपाली सागर होडगे (वय २६, रा. राजारामपुरी १३ वी गल्ली), संध्या अविनाश गोखले (मंडलिक वसाहत), आशा अरविंद गोंधळेकर (७३, रा. राजारामपुरी ८ वी गल्ली), कीर्ती प्रशांत कांबळे (२१, रा. मुंबई), / पान ९ वर
अटकेतील चेन स्नॅच ांशयित सतीश महादेव गायकवाड (वय २८, रा. हजारमाची, ता. कऱ्हाड, जि. सातारा), ज्ञानेश्वर दुर्गाप्पा गायकवाड (५५, रा. सोलापूर), किरण आनंदा पवार (३०, रा. उचगाव, ता. करवीर), उदय पांडुरंग गरड (३५, रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा).