शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या युनिक आॅटोमोबाईल्सला गंडा घालणाऱ्या चौघांना अटक, मुख्य सूत्रधार नायजेरियात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 19:03 IST

कोल्हापूर येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यां आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी झारखंडमध्ये अटक केली.

ठळक मुद्देआंतरराज्य टोळीचा पर्दाफाशपश्चिम बंगालमधील म्होरक्या नायजेरियात, पोलीस मागावर झारखंडमधील बिस्तपूर आणि नाशिकमध्येही आॅनलाइन रक्कम लंपास

कोल्हापूर : येथील युनिक आॅटोमोबाईल्स इंडिया या वाहन वितरण करणाऱ्या कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बँकिंगद्वारे तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यां आंतरराज्य टोळीतील चौघांना पोलिसांनी झारखंडमध्ये अटक केली.

संशयित राजीव रंजन कुमार (वय ३३, रा. पटना, बिहार), विकास साव ऊर्फ विकास कालू (३३, रा. पटना, बिहार), मातदिनसिंह सिकरवार ऊर्फ रामबीरसिंह परमार (रा. धौलपूर, राजस्थान) व संशयित महिला कहकसा परवीन (२८, रा. पटना) अशी त्यांची नावे आहेत. या टोळीचा म्होरक्या पश्चिम बंगालमधील असून तो नायजेरियात लपला आहे. पोलीस त्याच्या मागावर आहेत, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

युनिक आॅटोमोबाईल्स कंपनीचा युजर आयडीसह पासवर्ड हॅक करून नेट बँकिंगद्वारे कंपनीची तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली होती. ही रक्कम देशभरातील बारा बँक खात्यांवर वर्ग केली होती. नवी मुंबई, मुंबई, दिल्ली, जमशेदपूर, गुवाहाटी, पश्चिम बंगाल, आदी ठिकाणी असलेल्या खातेदारांच्या खात्यांमध्ये पाच ते वीस लाख रुपये वर्ग करण्यात आले होते.

पोलिसांनी संबंधित बँकांमध्ये जाऊन संशयित खात्यांची माहिती घेतली, खातेदारांचे पत्ते मिळविले; परंतु संशयितांनी स्वत:चे पत्ते व मोबाईल नंबर बदलल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. सायबर क्राइमच्या मदतीने शाहूपुरी पोलिसांनी झारखंडमधून महिला कहकसा परवीन हिच्यासह चौघांना ताब्यात घेतले. या चौघांच्या बँक खात्यावर ६० लाखांची रक्कम जमा झाल्याचे निदर्शनास आले.

त्यातील २० टक्के रक्कम या खातेदारांना मिळाली असून, उर्वरित रक्कम पश्चिम बंगाल येथील संशयिताने हडप केली आहे. याच टोळीने झारखंडमधील बिस्तपूर आणि नाशिकमध्येही अशाच पद्धतीने आॅनलाइन रक्कम लंपास केली आहे, अशी माहिती डॉ. अमृतकर यांनी दिली.

मोठे रॅकेटज्या कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल असते, त्यांचे बॅँक डिटेल्स मिळवून हॅकर्स कोट्यवधी रुपयांच्या रकमा आपल्या हस्तकांच्या बॅँक खात्यावर जमा करतात. या रकमा कोठून येतात, हे खातेदारांना माहीत नसते. त्यांना रकमेच्या स्वरूपात कमिशन मिळते. जर पैसे देण्यास खातेदाराने टाळाटाळ केली, तर पुन्हा त्या खात्यावर पैसे जमा केले जात नाहीत. हॅकरांचे हे मोठे रॅकेट असून ते उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस