जावीरला पसार करणाऱ्या चौघांना अटक
By Admin | Updated: December 16, 2014 00:57 IST2014-12-16T00:54:00+5:302014-12-16T00:57:36+5:30
तीन दिवसांची पोलीस कोठडी : गुन्हे अन्वेषणने आवळल्या मुसक्या

जावीरला पसार करणाऱ्या चौघांना अटक
कोल्हापूर : पन्हाळा न्यायालयात खटल्यासंदर्भात घेऊन जात असताना पोलिसांवर हल्ला करून कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या चौघा साथीदारांच्या मुसक्या इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या. त्यांना आज, सोमवारी पन्हाळा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली. फरार कैदी जावीर मात्र पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. त्याच्या मागावर पोलीस आहेत, अशी माहिती उपअधीक्षक पंकज शिरसाट यांनी दिली.
विजय जावीर याला कोतोली (ता. पन्हाळा) येथील सराफास लुटल्याप्रकरणी पन्हाळ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणीसाठी कळंबा मध्यवर्ती कारागृहातून हेडकॉन्स्टेबल अशोक कोरवी व पोलीस नाईक जावेद पठाण हे दोघे एस.टी. बसने घेऊन आले होते. एस.टी.तून उतरल्यानंतर काही अंतरावरच त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून त्याच्यासह पलायन केले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी कर्तव्यात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवत अशोक कोरवी व जावेद पठाण यांना निलंबित केले. दरम्यान, कैदी जावीर याच्या शोधासाठी पोलिसांनी जिल्ह्यात (पान १० वर)
अटक केलेल्यांची नावे अशी :
संशयित बाळासाहेब गावडेकर (रा. प्रगतीनगर, पाचगाव), दत्तात्रय बबन माळवदे (वय २२, कारंडे मळा, इचलकरंजी), आबा भगवान गरड (तारदाळ) व रामा कचरू गरड (रा. झोपडपट्टी, इचलकरंजी)
कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे दिला आहे. फरार जावीर याचा ठावठिकाणा मिळाला असून, लवकरच त्याला बेड्या ठोकू.
- डॉ. मनोजकुमार शर्मा
(पोलीस अधीक्षक)