शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election : सतेज पाटील, अमल महाडिक यांच्यासह चार अर्ज वैध, एक अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 20:04 IST

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह शौमिका महाडिक ...

कोल्हापूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननीत पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह शौमिका महाडिक व शशिकांत खोत यांचे अर्ज वैध ठरले. नगरसेवकांनी बोगस सह्यांची तक्रार केलेले उमेदवार संजय भिकाजी मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.जिल्ह्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी ५ उमेदवारांनी सात अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी आज, बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली. ही प्रक्रिया सव्वा बारा वाजता संपली. यावेळी महाविकास आघाडी, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मंत्री सतेज पाटील, भाजपचे अधिकृत उमेदवार माजी आमदार अमल महाडिक, भाजप महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक (अपक्ष) व शशिकांत खोत (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले.

उमेदवार संजय भिकाजी मागाडे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरील सुचक म्हणून नावे असलेल्या नगरसेवकांनी अर्जावर आमच्या बोगस सह्या करण्यात आल्याची तक्रार मंगळवारी केली होती. छाननी दरम्यान या सह्या बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने मागाडे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.उर्वरीत चारही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ही यादी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.आज सकाळच्या सुमारास अर्ज छाननी दरम्यान पाटील-महाडिक सर्मथक मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जमा झाले होते. यामुळे परिसरातील वातावरण तणावपुर्ण बनले होते. तर, भाजपचे नेते, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी  सायंकाळी पत्रकार परिषद घेत सतेज पाटील यांनी अर्जात खोटी माहिती दिली असल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नाही तर, याबाबत उद्या, गुरुवारी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जरी ते निवडून आले तरी त्यांना तीन महिन्यात अपात्र ठरवणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक