शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पोटाला चिमटा घेऊन पैसे जमा केले, संस्थाचालकांनी हडपले; औरवाडच्या राजीव पतसंस्थेत साडेचार कोटीचा अपहार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:24 IST

गणपती कोळी  कुरुंदवाड : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेत संस्थाचालकांनी साडेचार कोटीचा अपहार केल्याचे उघडकीस ...

गणपती कोळी कुरुंदवाड : औरवाड (ता. शिरोळ) येथील राजीव बिगर शेती सहकारी पतसंस्थेत संस्थाचालकांनी साडेचार कोटीचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या अपहारामुळे ग्रामीण भागातील मोलमजुरी करून पोटाला चिमटा घेऊन भविष्याची पुंजी सुरक्षित म्हणून संस्थेत ठेव ठेवणाऱ्या ठेवीदारांची गाळण उडाली आहे. संस्थाचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ठेवीदारांचे पैसे परत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतापराव आप्पाराव आगरे यांनी पुढाकार घेऊन १९९३ साली राजीव पतसंस्था स्थापन केली. सुमारे दीड हजार सभासदांचा विश्वास संपादन करत सुरुवातीच्या काळात संस्थेची आर्थिक बाजू भक्कम केली. मात्र आगरे याला संस्थेच्या आर्थिक सुबत्तेत सहकाराचा विसर पडून संस्थेच्या पंचविसाव्या वर्षातच स्वाहाकाराच्या प्रेमात पडले. शेतमजुरी करून घरचा चरितार्थ चालविताना स्वत:च्या पोटाला चिमटा घेत मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी कष्टाच्या मजुरीतून थोडी थोडी पुंजी साठवून राजीव पतसंस्थेत ठेवी ठेवणाऱ्यांची संख्या शेकडो आहेत. मात्र ठेवीदारांच्या ठेवीवर, सोने जिन्नसवर संस्थाचालकांनी ताव मारत गोरगरीब ठेवीदारांना भिकेकंगाल केले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव आगरे यांनी आपला मुलगा शैलेंद्र याला २०१६ साली संचालक मंडळात घेऊन खऱ्या अर्थाने स्वाहाकाराला सुरुवात झाली. संस्थेवर सध्या प्रशासक असून लेखापरीक्षण करण्यात आले. यामध्ये ठेव पावतीवर बनावट कर्ज काढणे, बनावट सोने गहाण, बनावट कागदपत्रे दाखवून कर्ज काढून रक्कम हडप केल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लेखापरीक्षक संभाजी शिंदे यांनी संस्थेचे अध्यक्ष आगरे याच्यासह संचालक मंडळ, व्यवस्थापक अशा एकूण १२ जणांविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी