मोर्चात चाळीस संघटनांचा सहभाग

By Admin | Updated: October 10, 2016 00:46 IST2016-10-10T00:46:04+5:302016-10-10T00:46:04+5:30

योगदानाच्याही घोषणा : मराठा क्रांती मोर्चासाठी शाहूनगरीत समाज, संघटना एकवटल्या

Forty organizations participate in the rally | मोर्चात चाळीस संघटनांचा सहभाग

मोर्चात चाळीस संघटनांचा सहभाग

कोल्हापूर : कोल्हापुरात १५ आॅक्टोबरला होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सुमारे ४० समाज व संघटनांनी रविवारी मुस्लिम बोर्डिंगमध्ये बैठक घेऊन पाठिंबा जाहीर केला. मोर्चात सहभागी होऊ असे सांगतानाच मोर्चासाठी काहीतरी योगदान देण्याचीही तयारी अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.
कोल्हापुरातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील अनेक संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका, मेळावे, रॅली घेऊन जनजागृती रॅली काढून मोर्चाला ‘यायला लागतंय’ असे आवाहन केले जात आहे. रविवारी दुपारी राजर्षी शाहूंच्या भूमीतील सुमारे ४० हून अधिक वेगवेगळ्या समाज व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मुस्लिम बोर्डिंगमध्ये झाली.
शाहूंच्या विचारांचे पाईक
राजर्षी शाहू राजांच्या विचारांचे पाईक म्हणून कोल्हापूरच्या मोर्चात विविध समाज, संघटना एकत्र आल्या आहेत. कोल्हापूरच्या मातीत सर्व जाती-धर्माची माणसे एकत्र येतात हे मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले आहे. या ऐक्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दूर ठेवणे योग्य आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे एकत्र येऊन देशातील एकात्मतेला नवी दिशा देण्याचे काम कोल्हापूर नगरीतून निश्चितच होईल अशीही अपेक्षा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सहभागी होणाऱ्या संघटना अशा
कोल्हापूर जिल्हा सिंधी समाज, भटक्या विमुक्त जाती-जमाती विचार मंच, सिंधी सेंट्रल पंचायत, लोणार समाज संघ, सुवर्णकार समाज संघ, कोळी समाज, महाराष्ट्र माथाडी कामगार संघ, धनगर समाज संघटना, वीरशैव वाणी समाज संघ, बागवान समाज, लमाण समाज, कोल्हापूर जिल्हा मुस्लिम ओबीसी आॅर्गनायझेशन, मुस्लिम खाटिक समाज, को. जि. खारे मासे विक्री संघ, बहुजन दलित महासंघ, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट), वीरशैव समाज कक्कया, कोल्हापूर लिंगायत समाज, यादव-गवळी समाज संघटना, रजपूत समाज, जि. मुल्ला-मुल्लाणी समाज, कंझारभाट समाज, माळी समाज, गिरी-गोसावी समाज, ओतारी समाज, जि. वडार समाज संघटना, कोचीकोरवी समाज, को. जि. मुस्लिम बेपारी समाज, पारधी समाज संघ, घिसाडी समाज संघ, ढोर समाज, चर्मकार समाज, गुरव समाज, महादेव कोळी समाज, धनगर महासंघ, मुस्लिम खाटिक समाज, पीपल्स रिपाइं पार्टी, फोर व्हीलर चालक असोसिएशन, सर्वोदय मंडळ, को. जि. फूटवेअर असोसिएशन.

Web Title: Forty organizations participate in the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.