शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सामानगडास अवकळा; सौंदर्य धोक्यात

By admin | Updated: July 29, 2014 23:03 IST

प्रेमीयुगुलांचा वावर : प्रचंड प्रमाणात बेकायदा वृक्षतोड; राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज

संजय थोरात - नूल , निसर्गाचे वरदान लाभलेला किल्ले सामानगड (ता. गडहिंग्लज) वनराईने नटलेला आहे. पर्यटनस्थळ विकास योजनेतून गडाचा कोट्यवधी रुपये खर्चून विकास झाला खरा; पण सध्या गडाला अवकळा आली आहे. गडावर प्रेमीयुगुलांचा वावर दिसत आहे. झाडाझुडपांनी अवशेष झाकल्याने गडाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.गडहिंग्लज तालुक्याच्या दक्षिण टोकास असणारा हा गड नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज याने १२व्या शतकात हा गड बांधला. १६७६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाची डागडुजी केली. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून पर्यटन विकास योजनेतून गडास ‘क’ वर्ग पर्यटनक्षेत्राचा दर्जा मिळाला. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी १ कोटी ३० लाख रुपये खर्चून गडाचा कायापालट करण्यात आला. तेव्हापासून हा गड पर्यटनाच्या नकाशावर झळकला.सध्या गडावर पुरातन हनुमान मंदिर, सत्पुरुष भीमशाप्पा यांची समाधी, शिवलिंग मंदिर, भवानी मातेचे मंदिर आहे. गडावरील हनुमान मंदिर, अंधार कोठडी, हनुमान विहीर, साखर विहीर, वेताळ बुरूज, सोंडी बुरूज, झेंडा बुरूज ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. गडावरून गडहिंग्लज शहर, कारखाना, हिडकल प्रकल्प, वल्लभगड, गुड्डाई अशी ठिकाणे दिसतात. त्यामुळे आंबोलीला जाणारे पर्यटक वर्षा सहलीला गडावर येतात. मात्र, गडाचे वेळीच संवर्धन होणे गरजेचे आहे.गडाच्या पावित्र्याला धोका...गडावर महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांची जोडपी पाहावयास मिळतात. या युगुलांच्या चाळ्यांमुळे गडाचे पावित्र्य धोक्यात येत आहे. सध्या गडास सार्वजनिक बांधकाम खाते, वनविभाग, पुरातत्व खाते यांपैकी कोणी वाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘गड’ नेमका कुणाच्या ताब्यात आहे, असा प्रश्न पडतो. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी गडाच्या दुरवस्थेत लक्ष घालावे, अशी इतिहासप्रेमी व पर्यटकांची मागणी आहे.बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे गडावर भग्नावस्था निर्माण झाली आहे. अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अंतर्गत रस्ते उखडले आहेत. गडाचे प्रमुख आकर्षण असलेली हनुमान विहीर, अंधार कोठडी, साखर विहिरीवर मोठमोठी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे बांधकामास धोका निर्माण झाला आहे. विहिरीही अस्पष्ट दिसतात. बालोद्यानातील खेळणी उद्ध्वस्त झाली आहेत. या उद्यानात जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. विश्रांतिगृह वर्षानुवर्षे बंदिस्त आहे. डॉर्मेट्री हॉल, उपाहारगृहाची दुरवस्था झाली आहे.