शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात काँग्रेसला धक्का! माजी जि. प. अध्यक्ष, विद्यमान सदस्य उमेश आपटेंचा सदस्यपदाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 17:38 IST

..त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठीच राजीनामा दिला

सदाशिव मोरे

आजरा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य उमेश आपटे यांनी आपल्या काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपुर्द केला. आपटे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राजीनाम्यानंतर आमटे यांनी आपण समाजसेवा करणार पण राजकारणापासून अलिप्त राहणार असल्याची माहिती दिली.काँग्रेस पक्षामध्ये वडील मुकुंदराव आपटे १९६५ पासून सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी उत्तूरचे सरपंचसह जि. प.मध्ये १४ वर्षे राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व केले. वडिलांच्या निधनानंतर गेली २७ वर्षे उमेश आपटे राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यरत आहेत. १० वर्षे पं.स. व १०  वर्षे जि. प. सदस्य पदावर काम केले आहे. तर ५ वर्षे पं.स. उपसभापती म्हणूनही काम केले आहे. साखर कारखान्यामध्ये ती दोन वेळा संचालक झाले. मात्र दोन्हीही वेळा ते अपात्र ठरले आहेत. पत्नी वैशाली आपटे या ५ वर्षे उत्तूरच्या लोकनियुक्त सरपंच होत्या.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकही ग्रामपंचायत काँग्रेसची आली नाही. गेली ३० वर्षे पक्ष वाढविणे व कार्यकर्ते टिकवण्यासाठी प्रयत्न केले. मानसिक दृष्ट्या मी थकलो आहे. व पक्षासाठी काम करण्याची सध्या आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये यासाठीच आपण राजीनामा दिला आहे. जनतेची समाजसेवा करणार मात्र कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे उमेश आपटे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेस