शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धर्मसंकटातील 'के. पी. पाटीलां'ना काँग्रेस पाठबळ देणे शक्य, शरद पवारांसोबतच राहण्याचा दिला सल्ला

By राजाराम लोंढे | Updated: July 5, 2023 13:53 IST

माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट

राजाराम लोंढे कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासमोर ‘दादा’ की ‘साहेब’ असे धर्मसंकट उभे राहिले आहे. त्यांच्यादृष्टीने ‘बिद्री’ कारखाना व आमदारकी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी तेथील राजकीय त्रांगडे पाहता कोणती भूमिका घ्यावी, अशी संभ्रमावस्था आहे. आगामी ‘लोकसभे’चे गणित सोपे करण्यासाठी त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहावे, असा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. त्या बदल्यात त्यांना विधानसभेला मदत करण्याची भूमिकाही काँग्रेसने घेतल्याचे समजते.गेली अनेक वर्षे ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या माध्यमातून के. पी. पाटील यांचे कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत चांगले नेटवर्क आहे. कारखानाही चांगल्या प्रकारे चालवल्याने त्यांच्याबाबत कार्यक्षेत्रात सहानुभूती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ‘के. पी.’च्या भूमिका वेगळे महत्त्व आहे. गेली ४० वर्षे ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाेबत आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर ते काय भूमिका घेणार याविषयी उत्सुकता आहे.सोमवारी त्यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतल्याने ते त्यांच्यासोबतच राहणार असे वाटते; पण त्यांच्यासमोर ‘राधानगरी’च्या राजकारणाचे त्रांगडे आहे. विधानसभेसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत जावे तर ‘बिद्री’ कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची मंजुरी, चौकशी आणि कारखाना निवडणूक या सगळ्यांमध्ये अडचणी येऊ शकतात. ही भीती त्यांच्या मनात दिसते. पाटील यांच्यासमोर असे धर्मसंकट उभे असताना, काँग्रेसच्या पातळीवरून लोकसभेचे गणित पाहून त्यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

मुश्रीफ यांची समजूत काढून तिथेच थांबू या

आगामी विधानसभेसह एकूणच भुदरगड व राधानगरी तालुक्यांतील राजकारणातील त्रांगडे पाहता, ‘बिद्री’ कारखान्यापुरते मंत्री हसन मुश्रीफ यांची समजूत काढा आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याची परवानगी घ्यावी, असा एक मतप्रवाह पाटील यांच्या गटाचा आहे.‘के. पी.’ शरद पवार यांच्यासोबत राहण्यात काँग्रेसचा हा स्वार्थमहाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस हाच ताकदवान पक्ष राहिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ‘कोल्हापूर’ची जागा काँग्रेसला मिळणार, हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेसची ताकद कोल्हापूर शहर, करवीर व राधानगरी तालुक्यांत आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगडमध्ये फारसे अस्तित्व नाही. अशा परिस्थितीत लोकसभेची जागा खेचून आणायची म्हटले तर या तालुक्यातील एखादा नेता सोबत असण्याची गरज आहे. दोन-तीन तालुक्यांत प्रभाव असणारे के. पी. पाटील हे सोबत असणे काँग्रेसला फायद्याचे आहे.विधानसभेला ‘के. पीं’ना असे मिळू शकते बळआमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, रिपाइं (काही गट)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणK P. Patilके. पी. पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस