माजी मंत्री भरमूआण्णांचा मुलगा, सून यांना अटक

By Admin | Updated: December 16, 2014 00:57 IST2014-12-16T00:52:51+5:302014-12-16T00:57:47+5:30

चेहरे उतरले - ग्रामसेवकही गजाआड - जागेचा वाद, जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Former minister Bharmuanna's son, Shun arrested | माजी मंत्री भरमूआण्णांचा मुलगा, सून यांना अटक

माजी मंत्री भरमूआण्णांचा मुलगा, सून यांना अटक

कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी पाटणे फाट्यावरील दुकानगाळे डोझरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून काशीनाथ कांबळे यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी आज, सोमवारी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांचे चिरंजीव व ‘गोकुळ’चे संचालक संशयित दीपक पाटील (वय ४७), त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील (३९, दोघे रा. बसर्गे, ता. चंदगड), ग्रामसेवक गणपती लक्ष्मण पाटील (४९, रा. धोमडेवाडी, ता. चंदगड) यांना अटक केली. या तिघांचा गडहिंग्लज न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने ही कारवाई केली.
दरम्यान, या तिघा संशयितांना रात्री उशिरा सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील हे कार्यकर्त्यांसह याठिकाणी आले. पाटील दाम्पत्यास अटक झाल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरताच खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, पाटणे फाट्यावर दीपक पाटील यांची जागा आहे. त्या जागेत फिर्यादी काशीनाथ कांबळे यांचे गॅरेज होते. तीन महिन्यांपूर्वी पाटील यांनी कांबळे यांना कोणतीच कल्पना न देता डोझरच्या साहाय्याने त्यांचे गॅरेज उद्ध्वस्त करून टाकले. याचा जाब विचारण्यासाठी कांबळे गेले असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कांबळे यांनी चंदगड पोलीस (पान १० वर)


चेहरे उतरले
अटक झाल्यामुळे महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील, त्यांचे पती दीपक पाटील यांचे चेहरे आज उतरले होते. दोघेही सीपीआरच्या अपघात विभागात बेडवर बसून होते.


ग्रामसेवकही गजाआड

जागेचा वाद, जातिवाचक शिवीगाळ प्रकरण

Web Title: Former minister Bharmuanna's son, Shun arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.