शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी घेतली शरद पवार यांची भेट, इचलकरंजीत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 13:57 IST

आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या सर्वांचीच गोची

इचलकरंजी : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी गुरुवारी सांगलीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे इचलकरंजीतील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, ते तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सहजच भेट घेतल्याचे सांगितले. परंतु, नेमके स्वत:साठी की अन्य कोणासाठी, त्यांनी ही भेट घेतली याबाबत खलबते सुरू आहेत. शेळके हे आमदार प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांनी यापूर्वी इचलकरंजीचे नगराध्यक्षपद आणि राज्यमंत्र्याचा दर्जा असलेल्या यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. पूर्वी बाळासाहेब माने गटाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कालांतराने त्यांना आवाडे यांच्याविरोधात उमेदवारीही दिली होती. मात्र, नगरपालिका कर्मचारी धक्काबुक्की प्रकरणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला होता.त्यानंतर शेळके सातत्याने भाजपचे काम करीत राहिले. जिल्हाध्यक्षपदावर काम करताना त्यांनी ग्रामीण भागात पक्षाची मजबूत बांधणी केली. तसेच मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांना साथ दिली. आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या सर्वांचीच गोची झाली होती.दरम्यान, पवार हे सांगली दौऱ्यावर असताना प्रकाश कुलकर्णी यांच्या घरी शेळके यांनी पवार यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील समजू शकला नाही. मात्र, शेळके हे स्वत: तुतारी घेणार की, दुसऱ्या उमेदवारासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. एखाद्याने भाजपमध्ये बंडखोरी करून उमेदवारी मिळविल्यास त्याचा मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे. असे झाल्यास सर्व राजकीय समीकरणेच बदलणार आहेत. तसेच काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणारे राष्ट्रवादीचे सचिव मदन कारंडे हे कोणती भूमिका घेणार, याकडेही लक्ष राहणार आहे.

शरद पवार यांचा दोनवेळा फोन आला होता. त्यामुळे त्यांना सहज भेटण्यासाठी गेलो होतो. उमेदवारीसंदर्भात आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. - हिंदुराव शेळके, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणBJPभाजपाSharad Pawarशरद पवार