केडीसीसीच्या माजी संचालकांची गोची
By Admin | Updated: February 20, 2015 23:09 IST2015-02-20T22:54:57+5:302015-02-20T23:09:20+5:30
सात दिवसांची मुदत : मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश

केडीसीसीच्या माजी संचालकांची गोची
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालकांना सात दिवसांत मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश सहकारमंत्र्यांनी दिल्याने त्यांची गोची झाली आहे. काही संचालकांनी अगोदरच आपली मालमत्तेची विल्हेवाट नातेवाईकांच्या नावावर लावली आहे तर काहीजण या निर्णयाने अडचणीत आले आहेत. विभागीय सहनिबंधकांनी केलेल्या कारवाईविरोधात माजी संचालकांंनी सहकारमंत्र्यांकडे याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी मालमत्ता जप्तीवर स्थगिती दिली, पण या काळात माजी संचालकांनी मालमत्तेची विल्हेवाट लावू नये, असे आदेश दिले आहेत. प्रत्येकाने वैयक्तिक, स्थावर, जंगम मालमत्तेचा तपशील प्रतिज्ञापत्रात नमूद करून प्राधिकरणासमोर सादर करण्यास सांगितले आहे. (प्रतिनिधी)