उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्षाला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:59+5:302021-03-30T04:14:59+5:30
इचलकरंजी : येथील एका माजी उपनगराध्यक्षाला उघड्यावर लघुशंका करताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून २०० रुपयांचा दंड केला. संबंधित व्यक्ती मोठा ...

उघड्यावर लघुशंका केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्षाला दंड
इचलकरंजी : येथील एका माजी उपनगराध्यक्षाला उघड्यावर लघुशंका करताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून २०० रुपयांचा दंड केला. संबंधित व्यक्ती मोठा उद्योगपती आहे. त्याच्या दंडाची पावती व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
शासनाकडून प्राप्त आदेशानुसार, नगरपालिकेकडून सर्वत्र कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी सार्वजनिक ठिकाणी एक प्रभारी माजी उपनगराध्यक्ष लघुशंका करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. त्यांनी त्याला पकडून २०० रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, फोटो व पावती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. शहरातील अनेक ठिकाणच्या मुताऱ्या गायब झाल्या असून, ज्याठिकाणी आहेत, त्या अतिशय खराब झाल्या आहेत. त्यामुळे वयस्कर व्यक्ती, आजारी व्यक्तींना लघुशंकेसाठी जास्त वेळ थांबता येत नाही. त्यांची गैरसोय होत आहे. पालिकेने मुताऱ्या खरेदी करून त्या एका मैदानावर थप्पी मारून ठेवल्या आहेत. परंतु बसविल्या जात नाहीत, अशी टीकाही होत आहे.