पेठ वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST2021-02-20T05:08:12+5:302021-02-20T05:08:12+5:30

पेठवडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे, ...

Former councilor of Peth Wadgaon R. D. Patil passed away | पेठ वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन

पेठ वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन

पेठवडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद सदस्य डाॅ. अशोक माने, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्ष मोहनलाल माळी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

आर. डी. पाटील (वडगावकर) यांचे मूळ गाव भादोले होते. बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी ३० वर्ष प्राचार्य म्हणून काम केले.

१९९१,१९९६ (स्वीकृत), २००६ या काळात वडगावचे नगरसेवक होते तर १९९७ ते २००३ या कालावधीत त्यांनी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपद भूषविले तर राज्य मुख्याध्यापक संघाचे संचालक ही होते.

१ नोव्हेंबर २०१९ पासून ते प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेचे चेअरमन होते. दुपारी आर. डी. पाटील (वडगावकर) यांचे पार्थिव शाहू संस्थेच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यांची शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून किणी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. रक्षाविसर्जन उद्या, शनिवारी आहे.

१८ आर.डी.पाटील

Web Title: Former councilor of Peth Wadgaon R. D. Patil passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.