शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सत्तेसाठी अंबाबाईला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:53 IST

याआधी प्रमोद सावंत यांनीही कोल्हापुरात येवून अंबाबाई देवीचे दर्शन घेतले होते

कोल्हापूर : गोव्यामध्ये काँग्रेस सत्तेत यावे यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला साकडे घातले. दिगंबर कामत हे आज, गुरुवारी सपत्नीक कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यांचे समवेत माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांची देखील भेट घेतली. तेथून ते नृसिंहवाडीला दत्त दर्शनास गेले. कामत यांचा खासगी दौरा असलेने प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. याआधी प्रमोद सावंत यांनीही कोल्हापुरात येवून अंबाबाई देवीचे दर्शन घेतले होते.

गोव्यामध्ये यावेळच्या विधानसभा निडणुकीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. दरम्यान, मतदान प्रक्रियेनंतर  त्रिशंकू विधानसभेचे संकेत मिळत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास काँग्रेस पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा असून, सरकार स्थापन करण्यासाठी येथे कुठल्याही पक्षाला २१ जागा जिंकणे आवश्यक आहे. या निवडणुकीत तब्बल ७८.९४ टक्के मतदान झाल्याने गोव्यात पुन्हा भाजपाचं कमळ फुलणार की सत्ता परिवर्तन होणार याची चर्चा सुरू आहे. येत्या १० मार्चला निकालानंतर मात्र सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgoaगोवाMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर