जयसिंगपूर पालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना

By Admin | Updated: July 4, 2016 00:38 IST2016-07-04T00:38:21+5:302016-07-04T00:38:21+5:30

हरकतीची मुदत १५ जुलैपर्यंत : अंतिम आराखडा २७ जुलैपर्यंत जाहीर करण्याची मुदत

Formats for Jaisingpur Municipal Corporation | जयसिंगपूर पालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना

जयसिंगपूर पालिकेसाठी प्रारूप प्रभागरचना

जयसिंगपूर : आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना निश्चित करण्यात आली आहे़ गतनिवडणुकीत सहा प्रभाग होते़ येणाऱ्या निवडणुकीत बारा प्रभाग असणार आहेत़ १५ जुलै पर्यंत हरकती घेण्याची मुदत असून, २७ जुलैपर्यंत अंतिम आराखडा निश्चित केला जाणार आहे़ प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता थेट नगराध्यक्ष आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे़
जयसिंगपूर नगरपालिका अंतर्गत एकूण १२ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत़ एका प्रभागात दोन असे चोवीस सदस्य निवडून द्यावयाचे आहेत़ व्दिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रचाराला आणि प्रभागात काम करण्यासाठी सोयीचे ठरणार आहे़ प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आला आहे़ प्रभाग १ मध्ये रेल्वे स्टेशन मळा भाग, गणेश कॉलनी, गल्ली नंबर १, २, ३, ४, ५ व ६ चा भाग, कुंभार वसाहत, प्रभाग २ मध्ये गल्ली नंबर ६, ७, ८, ९, १० व ११ चा भाग व जुना उदगाव रस्ता ते कोल्हापूर-सांगली रस्त्यापर्यंतचा मळा भागाचा समावेश आहे़ प्रभाग ३ मध्ये कोकणे पाटील मळा ते गल्ली नंबर ५ व ६ चा प्रभाग, नवीन व मधील गल्ली नंबर ५, ६, ७, ८, आवटी कॉलनी, गर्ल्स हायस्कूलजवळील मळा भाग, राजीवनगर, गल्ली नंबर ६, ७ यांचा समावेश आहे़ प्रभाग ४ मध्ये राजीवनगर झोपडपट्टी, गल्ली नंबर ६, ७, ८, ९, खामकर मळ्याचा समावेश आहे़ प्रभाग ५ मध्ये गल्ली नंबर ८, ९ व ९ अ, ११ व १२, अजिंक्यतारा सोसायटी, राजीव गांधीनगर गल्ली नं़ ८, काडगे मळा यांचा समावेश आहे़ प्रभाग ६ मध्ये गल्ली नं़ १२ ते १६, शिवाजी हौसिंग सोसायटी, शिंदे कॉलनी, विकास कॉलनी, यड्रावकर कॉलनी, वरद कॉलनी, साई कॉलनी यांचा समावेश आहे़ प्रभाग ७ मध्ये संभाजीनगर, विद्यासागर सोसायटी, काडगे मळा, शिवाजी हौसिंग सोसायटी, गल्ली नं़ १७, १८, १९, यादवनगर, इंदिरानगर, प्रकाश हौसिंग सोसायटी यांचा समावेश आहे़ प्रभाग ८ मध्ये अजिंक्यतारा सोसायटी, यशवंत सोसायटी, रामनगर, महालक्ष्मीनगर, शाहूनगर, अवचित नगर, चाँदतारा मस्जिद परिसराचा समावेश आहे़ प्रभाग ९ मध्ये समडोळे मळा, यशवंत सोसायटी, हेरवाडे कॉलनी, खामकर मळा, दीपनगर, मारुती पार्क, दत्त कॉलनी, उज्ज्वलनगर, राजीव गांधीनगर यांचा समावेश आहे़ प्रभाग १० मध्ये शाळा नं़९ शाहूनगर समोरील भाग, रि़स़नंबर ९०, समडोळे मळा, अवचित नगर, शिवशक्ती कॉलनी यांचा समावेश आहे़ प्रभाग ११ मध्ये इंदिरा हौसिंग सोसायटी पश्चिम, डवरी सोसायटी, गणपती व जैन मंदिर परिसर, बायपास दक्षिणेकडील परिसर, सिध्देश्वर कॉलनी यांचा समावेश आहे़ प्रभाग १२ मध्ये गल्ली नं़ १९, २० व २१ चा भाग लक्ष्मी पार्क, आंबेडकर सोसायटी, ऩ पा़ नोकर हौसिंग सोसायटी, दीनबंधू, स्वप्ननगरी, प्रकाश हौसिंग सोसायटी, इंदिरानगर झोपडपट्टी यांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Formats for Jaisingpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.