थकीत कर्जमाफी द्या, अन्यथा आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:25 IST2021-03-09T04:25:45+5:302021-03-09T04:25:45+5:30

गारगोटी : थकीत कर्जदार आणि नियमित कर्जदारांना शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर न केल्यास ...

Forgive the overdue debt, otherwise let's agitate | थकीत कर्जमाफी द्या, अन्यथा आंदोलन करू

थकीत कर्जमाफी द्या, अन्यथा आंदोलन करू

गारगोटी : थकीत कर्जदार आणि नियमित कर्जदारांना शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर न केल्यास भुदरगड तालुक्यात भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने दोन लाखावरील थकीत कर्जदार व एक लाखाचे आतील कर्जदार यांची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला बराच कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या घोषणेचा विनाविलंब तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत कर्जाची रक्कम व जाहीर केलेले अनुदान त्वरित जमा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा त्वरित लाभ न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल.

यावेळी राहुल देसाई, ‘बिद्री’चे संचालक प्रदीप पाटील, सरचिटणीस अनिल तळकर, भाजप शहराध्यक्ष प्रकाश वास्कर, सुरेश खोत, संजय देसाई, प्रताप मेंगाने, रंगराव बाऊसकर, सदाशिव देवर्डेकर, एम. डी. पाटील, सुरेश खोत, सुहास कांबळे, सुरेश गुरव, दगडू राऊळ, सुरेश अप्पा देसाई, किरण कुरडे, सर्जेराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो :८ गारगोटी राहुल देसाई निवेदन

ओळ:

कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी या मागणीचे निवेदन तहसीलदार आडसुळे यांना देताना राहुल देसाई, प्रकाश वास्कर, संजय देसाई, एम. डी. पाटील, सदाशिव देवर्डेकर, किरण कुरडे आदी.

Web Title: Forgive the overdue debt, otherwise let's agitate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.