शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’त हेल्मेट सक्ती  : अजित शिंदे, ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:39 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी  मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे‘आरटीओ’त हेल्मेट सक्ती : अजित शिंदे ३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानात घोषणा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यापासून पहिल्यांदा हेल्मेट सक्तीची सुरुवात करावी. याचा विचार करून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) अधिकारी व कर्मचारी  मंगळवारपासून कार्यालयात हेल्मेट घालून येतील, अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केली. जे परिवहन अधिकारी, कर्मचारी हेल्मेट घालून येणार नाहीत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगरू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.३० व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते ताराबाई पार्कातील परिवहन कार्यालयात बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागप्रमुख प्रा. पी. डी. गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारिस, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, आदींची प्रमुख उपस्थिती होती. रविवार (दि. १०) पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे.अजित शिंदे म्हणाले, बिहार, तमिळनाडूमध्ये हेल्मेटसक्ती आहे; पण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत हेल्मेट सक्ती नाही. आपली सुरक्षा, आपल्या हाती आहे. आपल्याला सुधारायचे असेल, तर आपण स्वत: सुधारले पाहिजे, तरच समाज सुधारेल आणि आपणही सुखी व्हाल. १९८५ ला त्याकाळी अत्याधुनिक पद्धतीच्या दुचाकी, चारचाकी येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वाहनांची संख्या वाढली; परंतु, रस्ते वाढले नाहीत. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक केले. तसेच जे अधिकारी, कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, त्यांच्यावर परिवहन व पोलीस विभागातर्फे कारवाई करू.अनिल गुजर म्हणाले, केवळ सात दिवस रस्ते सुरक्षा अभियानात वाहनांचे नियम पाळू नका. ते कायमस्वरूपी पाळावे, तरच रस्ते सुरक्षा अभियानाचा उद्देश सफल झाला, असे म्हणता येईल. यावेळी पी. डी. गायकवाड यांनी वाहतूक नियमांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने स्पीडवर नियंत्रण ठेवले पाहिजे, मनाचा वेग वाढवू नका. हेल्मेटसक्ती होणे गरजेचे आहे.

आपण नियम पाळूनसुद्धा चुका करूनये, असा सल्ला दिला. यानंतर मिशन डिफेन्स ड्रायव्हिंग स्टिकर्स वाहनांवर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी चारचाकी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती उपस्थित होते. वरिष्ठ मोटारवाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी प्रास्ताविक केले. साहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी आभार मानले. 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसkolhapurकोल्हापूर