कागल : कागलमध्ये थेट नगराध्यक्ष निवडीसाठी तिसऱ्यांदा महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. गटातटाच्या राजकारणामुळे कागलमध्ये चुरस असतेच मात्र महिला खुल्या प्रवर्गामुळे उमेदवारीसाठी मातब्बर नावे पुढे येणार आहेत. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या दोन गटाच्या उमेदवारांमध्ये ही दुरंगी लढत होईल. असे चित्र असले तरी तिरंगी लढतीची शक्यता नाकारता येत नाही. कारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही उत्साही कार्यकर्ते समाजमाध्यमांवर काही नावे जाहीर करीत आहेत. त्यामध्ये शौमिका महाडिक यांच्या मातोश्री मृगनयनाराजे घाटगे यांचे नावही झळकत आहे.२०१६ मध्ये मुश्रीफ गटाच्या माणिक माळी या राजे गटाच्या निशा रेळेकर यांच्या विरुद्ध अवघ्या १०४ मतांनी निवडून आल्या, तर २००१ साली राजे गटाच्या कांचनमाला आनंदराव घाटगे यांनी मंडलिक गटाच्या शोभा बाबगोंडा पाटील यांचा १३४० मतांनी पराभव केला होता. शहरातील इतर गट, विविध घटक व अंतर्गत व बाह्य प्रवाह लक्षात घेता मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर आपल्या गटाचा उमेदवार निवडीचेच खरे आव्हान असणार आहे.
Web Summary : Kagal will witness a third direct mayoral election contested by women. Rival factions of Minister Hasan Mushrif and Samrajit Ghatge will likely clash. Internal dynamics make candidate selection challenging for Mushrif.
Web Summary : कागल में तीसरी बार महिला मेयर के लिए सीधा चुनाव होगा। मंत्री हसन मुश्रीफ और समरजित घाटगे गुटों में टक्कर संभावित है। आंतरिक गतिशीलता के कारण मुश्रीफ के लिए उम्मीदवार चयन चुनौतीपूर्ण है।