संदीप आडनाईककोल्हापूर : सिद्दी जौहरच्या वेढ्यातून पालखीतून निसटलेले शिवाजी महाराज विशाळगडाच्या वाटेवर निघतात, तेव्हा पडद्यावरचा तो महामूर पाऊस सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, धुके, बाजीप्रभूंची शत्रूशी झालेली हातघाई हा पन्हाळगडावरील रणसंग्राम प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. हे शक्य झाले पन्हाळगडावर नव्याने उभारलेल्या चित्रपटगृहातील १३ प्रकारच्या सेन्सरी इफेक्ट्समुळे.पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने उभारलेल्या देशातील पहिल्या अत्याधुनिक १३ डी तंत्रज्ञानाचा चित्रपट ऐतिहासिक पन्हाळगडावरील इंटरप्रिटिशन सेंटरच्या इमारतीत तयार केलेल्या विशेष चित्रपटगृहाचे लोकार्पण गुरुवारी (दि. ६) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आपण जे चित्रपट पाहतो, ते २डी फॉरमॅटमधील आहेत. त्यानंतर ३डी, मग ७डी चित्रपट पाहिलेे; परंतु आता देशात प्रथमच पन्हाळ्यावर १३डीमध्ये चित्रपट पहायला मिळणार आहे.
थिएटरमध्ये लढाईची प्रत्यक्ष अनुभूतीशिवा काशीद शिवाजी महाराजांच्या वेशात पकडले जातात, तेव्हा शत्रूशी आपणच लढाई करतोय, बाजीप्रभू लढत असताना शत्रूवर फेकलेले भाले समोरून आपल्या दिशेने येतात, असे वाटून तुमची खुर्ची आपोआप बाजूला झुकते, अंधाऱ्या रात्री थिएटरमध्येही विजा कडाडतात, मावळे जंगलातून पायी जात असताना पालापाचोळ्याचा होणारा आवाज आपल्या पायांना जाणवतो, आपल्या खुर्चीखाली हवेची झुळूक अनुभवयाला मिळते.
२१ मिनिटांचा चित्रपट
शिवकाळातील प्रसंग प्रत्यक्ष जिवंत केला आहे, तो आर्टिक्सचे कोल्हापूरचे अभय ऐतवडेकर यांनी. त्यांचा ‘पन्हाळगडचा रणसंग्राम’ हा २१ मिनिटांचा चित्रपट १३ डीमध्ये पहायला मिळाला. याची संकल्पना आमदार विनय काेरे यांची आहे. व्हीडीके यांची टीम सोबतीला आहे.खास चित्रपटगृह१३डीचा अनुभव विशेष पन्हाळ्यावर उभारलेल्या विशेष थिएटरमध्येच अनुभवता येतो. यासाठी विशेष प्रकारचे प्रोजेक्शन यंत्रणा, ध्वनितंत्रज्ञान, मोशन सीट्स आणि सेन्सरी इफेक्ट्स सिस्टीम इथे उभारली आहे. यातून प्रेक्षकांना अत्यंत सखोल आणि वास्तवदर्शी अनुभव मिळतो. हे थ्रीडी तंत्रज्ञानाच्या पुढचे अद्ययावत तंत्रज्ञान आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे.