उपनगरांत मतदारांची पायपीट
By Admin | Updated: November 2, 2015 00:43 IST2015-11-02T00:43:46+5:302015-11-02T00:43:46+5:30
मतदानाचा उत्साह कायम : वृद्ध, आजारी मतदारांनीही बजावला हक्क

उपनगरांत मतदारांची पायपीट
कोल्हापूर : गांधी मैदान क्षेत्रीय निवडणूक कार्यालयांतर्गत येणाऱ्या फुलेवाडी रिंग रोड, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, सुर्वेनगर, जीवबा नाना पाटीलनगर या चार प्रभागांतील मतदारांना मतदानासाठी बरीच पायपीट करावी लागली. हे प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठे असल्याने मतदारांच्या घरांपासून मतदान केंदे्र काही अंतरावर होती.
उपनगरातील चार प्रभागांतील मतदारांची घरे मतदान केंद्रापासून लांब अंतरावर असल्याने मतदारांना कष्ट घ्यावे लागले. काही ठिकाणी दोन-तीन किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रात जाऊन मतदारांनी कर्तव्य बजावले. महिला-पुरुष मतदार गटागटाने मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र उपनगरातून पाहायला मिळाले. उपनगरांत विशेषत: नोकरदार, कष्टकरी समाज मोठ्या संख्येने आहे. सकाळी लवकर केंद्रावर जाऊन, मतदान करण्याचा निर्णय घेऊन मतदार सकाळीच बाहेर पडले. त्यामुळे सकाळी साडेआठपासून केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
स्वाभिमानी मतदार
फुलेवाडी रिंग रोडवरील राजर्षी शाहू हायस्कूलमधील चारही मतदान केंद्रांवर सकाळी दहा वाजता मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नृसिंह कॉलनीतील सुमारे पन्नास ते साठ पुरुष मतदार डोक्यावर पांढऱ्या टोप्या घालून मतदानाला आले होते. या टोप्यांवर ‘स्वाभिमानी मतदार’ असे शब्द लिहिले होते. या मतदारांनी सांगितले की, आम्ही कोणाहीकडूनही एक पैसाही घेतलेला नाही. आमचे अनुकरण इतरांनीही करावे आणि ताठ मानेने मतदान करावे, असा संदेश देण्याच्या हेतूने आम्ही या टोप्या घातल्या