फुटबॉलपटूंना सुगीचे दिवस

By Admin | Updated: July 20, 2015 00:12 IST2015-07-20T00:12:14+5:302015-07-20T00:12:25+5:30

चिंटा चंद्रशेखर : गडहिंग्लजला ३० खेळाडूंचा गौरव

Footballers' Sweep Day | फुटबॉलपटूंना सुगीचे दिवस

फुटबॉलपटूंना सुगीचे दिवस

गडहिंग्लज : भारतीय फुटबॉल क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. इंडियन सुपर लीग (आयएसएल), आयलीग यामुळे फुटबॉलपटूंना सुगीचे दिवस आहेत. मेहनत, शिस्तीच्या जोरावर खेळाडूंनी यशाची शिखरे पार करावीत, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय खेळाडू चिंटा चंद्रशेखर यांनी व्यक्त केली.शहरातील युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित गुणवंत खेळाडूंच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश कोळकी होते.चंद्रशेखर म्हणाले, नवोदित खेळाडूंना अनेक संधी उपलब्ध आहेत. सरावात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते. त्याला शिस्तीची जोड दिल्यास हे यश अधिक काळ टिकते. यावेळी विक्रम पाटील, महेश परीट, निखिल खन्ना, सौरभ पाटील, यशवंत साळवी, पंधरा वर्षांखालील महालक्ष्मी ट्रॉफी जिंकणाऱ्या युनायटेडचे खेळाडू, अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अरविंद कित्तूरकर, सतीश पाटील, जगदीश पट्टणशेट्टी, राहुल पाटील, एस. आर. पाटील, प्रकाश परीट, भैरू माळगी यांचा सत्कार झाला.
यावेळी टी. बी. चव्हाण, रवींद्र बेळगुद्री, गजेंद्र बंदी, आप्पासाहेब पाटील, अमित देवगोंडा, भैरू सलवादे, प्रशांत दड्डीकर, मनीष कोले, अनिल चौगुले, महेश सुतार, महादेव पाटील आदी उपस्थित होते. दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. किरण म्हेत्री यांनी सूत्रसंचालन केले. सतीश पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Footballers' Sweep Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.