शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आई.. हा माझा शेवटचा कॉल, म्हणत कोल्हापुरातील फुटबॉलपटूने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:31 IST

राजाराम तलाव परिसरात केले कीटकनाशक प्राशन 

कसबा बावडा : आई, हा माझा शेवटचा कॉल. मी आत्महत्या करतोय, असा फोन करून बावड्यातील फुटबॉलपटू तरुणाने राजाराम तलाव परिसरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यास तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारदरम्यान त्याचे निधन झाले.

हर्षवर्धन अशोक काळे (वय २७, रा. माळ गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मनमिळावू असणाऱ्या हर्षवर्धनच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.एका पतसंस्थेत पिग्मी एजंटचे व एका खासगी शिक्षण संस्थेत लिपिकचे काम करीत असलेला हर्षवर्धन सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडला. राजाराम तलाव परिसरात त्याने कीटकनाशक प्राशन केले व आईला फोन केला. 'आई, हा तुला केलेला माझा शेवटचा कॉल आहे’, असे म्हणत त्याचे फोनवरील बोलणं बंद झाले.

तत्काळ मोबाइल लोकेशनवरून तो नेमका कुठे आहे याचा शोध घेण्यात आला. राजाराम तलाव परिसरात तो आढळला. त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात हलवले. पण, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याचा मित्रपरिवार मोठा असल्याने सीपीआर आवारात मोठी गर्दी झाली होती. हर्षवर्धन बावडा फुटबॉल क्लबचा उत्कृष्ट गोलकीपर होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.