शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील फुटबॉल हंगाम लवकरच सुरू, मालोजीराजेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:57 IST

त्यामुळे स्पर्धा पुन्हा पुढे ढकलली. मात्र, लवकरच पुढील तारीख जाहीर करून हंगाम सुरू केला जाईल

कोल्हापूर : संतोष ट्रॉफी निवड चाचणी, आंतर जिल्हा स्पर्धा आणि पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय फुटबॉल स्पर्धांमध्ये के.एस.ए. नोंदणी झालेल्या बहुतांशी संघातील खेळाडूंचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे लीग स्पर्धेची सुरुवात तूर्तास पुढे ढकलावी, अशी विनंती संघांनी केली होती. त्यानुसार पुन्हा स्पर्धा पुढे ढकलली. लवकरच पुढील तारीख जाहीर करून हंगाम सुरू केला जाईल, अशी माहिती के.एस.ए अध्यक्ष व एआयएफएफचे सदस्य मालोजीराजे यांनी शुक्रवारी दिली.मालोजीराजे म्हणाले, कोल्हापूरच्या परिघाबाहेर जाऊन फुटबाॅलकडे पाहण्याची नवी दृष्टी कोल्हापुरातील संघांनी आणि खेळाडूंनी बाळगली पाहिजे. संतोष ट्रॉफी स्पर्धेतील एक सामन्यातील सहभागही एखाद्या खेळाडूचे करियर घडवतो. त्याला रेल्वे, पोस्ट, कस्टम, आयकर, आरसीएफ, लष्करांमध्ये नोकरीसाठी उपयोगी आहे. याशिवाय चमकदार कामगिरी केल्यास राष्ट्रीय संघांचेही प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते. त्यामुळे स्थानिक स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.त्यापेक्षाही संतोष ट्राॅफी स्पर्धा खेळाडूंच्या दृष्टीने जास्त महत्त्वाच्या आहेत हे ध्यानात घ्या.फुटबॉल लीगची खेळाडूंसह संघ नोंदणी १५ नोव्हेंबरला पूर्ण झाली. प्रथम ४ डिसेंबरला हंगाम सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये आंतरविद्यापीठीय फुटबाॅल स्पर्धामध्ये बहुतांशी संघातील खेळाडू सहभागी होणार असल्याने संघांच्याच प्रतिनिधींनी स्पर्धेची पुढील तारीख ठरवावी, अशी विनंती केली.

त्यानंतर संतोष ट्रॉफी निवड चाचणी, पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय स्पर्धा, आंतर जिल्हा स्पर्धांमुळे खेळाडू अजूनही कोल्हापूर बाहेर आहेत. त्यामुळे संघांच्याच विनंतीवरून हंगामाची सुरुवात पुन्हा पुढे ढकलली. त्यामुळे संघांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोणत्याही संघाला, खेळाडूला वा व्यक्तीला के.एस.ए.ने कधीच झुकते माप दिलेले नाही. समर्थकांनी मात्र सोशल मीडियावर गैरसमज पसरवू नयेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल