शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
3
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
4
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
5
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
6
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
7
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
8
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
9
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
10
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
11
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
12
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
13
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
14
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
15
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
16
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
17
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
18
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
19
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
20
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली

Kolhapur Football: कोल्हापुरात फुटबॉलची किक ऑफ नोव्हेंबरमध्ये होणार, परराज्यातील ४२ खेळाडूंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:46 IST

Kolhapur Football: गेल्या काही महिन्यांपासून फुटबॉल चाहते कोणत्या संघात कोणता खेळाडू खेळणार, याबद्दल उत्सुक होते, ती नोंदणी पूर्ण झाली

कोल्हापूर : फुटबॉलप्रेमींसाठी बहुप्रतीक्षित के.एस.ए. फुटबॉल लीग हंगामासाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. एकूण १६ संघ आणि ३१९ खेळाडूंची नोंदणी झाली आहे. देशभरातून ४२ खेळाडूंची असून ३३ जण नवीन असून ९ जुने आहेत. श्री छत्रपती शाहू स्टेडियमची डागडुज्जी पूर्ण झाल्यानंतर फुटबॉल हंगाम सुरु होणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत फुटबॉलची किक ऑफ होण्याची अपेक्षा आहे.कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये 'ए' डिव्हिजनसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात स्थानिक आणि परराज्यातील खेळाडूंचा समावेश आहे. एकूण १६ संघ आणि ३१९ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. ४२ खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याबाहेरील असून ते गोवा, केरळ, पंजाब आणि ईशान्येकडील राज्यांमधून आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून फुटबॉल चाहते कोणत्या संघात कोणता खेळाडू खेळणार, याबद्दल उत्सुक होते, ती नोंदणी पूर्ण झाली आहे. एकूण १६ संघांपैकी १५ संघांनी प्रत्येकी २० खेळाडूंची नोंदणी केली आहे. सुभाषनगर फुटबॉल क्लबने १९ खेळाडूंची नोंदणी केली आहे. त्यामुळे एकूण ३१९ खेळाडू झाले आहेत.परराज्यातील खेळाडूंचा समावेशसंघांत यंदा लीग स्पर्धा रंगणार आहे. या संघांकडून खेळणाऱ्या नवोदित स्थानिक, मणिपूर, केरळ, तमिळनाडू, सोलापूर, जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील खेळाडू स्थानिक संघाना विजयी करणार आहेत. यातील अनेक खेळाडू आयएसएल लीगमध्ये विविध नामांकित संघांकडून खेळले आहेत.स्टार खेळाडूस्थानिक व बाहेरील राज्यांतील स्टार खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाचा हंगाम अधिक रोमांचक ठरणार आहे. लवप्रीत, सार्थक, गुरुराज, अक्षय, सुदर्शन, पृथ्वीराज, प्रभू, मणिकंदन, स्टॅलीन, नानगमबा, ब्रह्मा, मोहम्मद, रोहन, प्रतीक, बलविंदर, फेबीन, रविराज, इतिफाक, सुबय्या, जॉन स्टार खेळाडू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Football Kick-Off in November, Includes 42 Players From Other States

Web Summary : Kolhapur's K.S.A. Football League season is set to begin in November. Sixteen teams, including 42 players from states like Goa, Kerala, and Manipur, are registered. The league promises exciting matches with both local and out-of-state talent after stadium renovations.
टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर