कोरोना नियमांचे पालन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:14+5:302021-03-26T04:23:14+5:30
शिरोळ : शहरात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पालिका प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. घरातून बाहेर पडताना मास्कचा ...

कोरोना नियमांचे पालन करा
शिरोळ : शहरात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पालिका प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना केल्या आहेत. घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. शहरात नागरिक व वाहनधारकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले आहे.
४० हजारांहून अधिक शहराची लोकसंख्या आहे. गतवर्षी नागरिकांनी पालिका प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. आरोग्य विभागाने चांगली भूमिका पार पाडली आहे. कोरोनाच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. कोरोना विरुद्धची लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे शहर सुरक्षित ठेवण्याची सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे. सध्या शिरोळमध्ये ३ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. त्यांना क्वारंटाईन केलेले आहे. आणखीन रुग्णसंख्या वाढू नये याकरिता नागरिकांनी सतर्क राहून घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. व्यापारी, दुकानदार, फळ-भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करून विना मास्क ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नये, असे आवाहन नगराध्यक्ष पाटील व मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी यांनी केले आहे.