डॉक्टर्स डे निमित्त लोकरंग नृत्याविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST2021-07-18T04:18:46+5:302021-07-18T04:18:46+5:30
कोल्हापूर : डॉक्टर्स डेनिमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने मायमराठीचे लोकरंग हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात डॉक्टरांनी दिंडी, भारूड, ...

डॉक्टर्स डे निमित्त लोकरंग नृत्याविष्कार
कोल्हापूर : डॉक्टर्स डेनिमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने मायमराठीचे लोकरंग हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात डॉक्टरांनी दिंडी, भारूड, वाघ्या मुरळी, कोळी नृत्य, शेतकरी नृत्य, भूपाळी, कडकलक्ष्मी, डोंबारी नृत्य, लावणी, आदिवासी-धनगरी नृत्य अशी विविध प्रकारातील नृत्ये सादर केली.
कोरोनाच्या काळातील सततच्या धावपळीतून व ताणतणावातून थोडा दिलासा मिळावा व डॉक्टरांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. डॉ. अमर आडके यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाखाली झालेला हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे प्रदर्शित करण्यात आला. राज्यातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखांमधील ५ हजारांहून अधिक डॉक्टरांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी अध्यक्षा आशा जाधव, सचिव डॉ. किरण दोशी, खजानीस डॉ. ए. बी. पाटील, आर्ट सर्कलचे समन्वयक डॉ. रवींद्र शिंदे, संदीप साळोखे, पी. एम. चौगुले, उपस्थित होते. डॉ. अशोक जाधव, डॉ. सूरज पवार, डॉ. प्रसाद व पल्लवी मोटे, डॉ. संजना व संदेश बागडी, डॉ. राजेंद्र वायचळ, यांच्यासह डॉक्टरांनी नृत्याविष्कार सादर केला.
---
फाेटो नं १७०७२०२१-कोल-मेडिकल असोसिएशन
ओळ : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स डेनिमित्त मायमराठीचे लोकरंग हा नृत्याविष्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.
---