इचलकरंजी पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:27 IST2021-08-23T04:27:54+5:302021-08-23T04:27:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत होत असून, आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ...

Fly the NCP flag on Ichalkaranji Municipality | इचलकरंजी पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा

इचलकरंजी पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत होत असून, आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी केले.

येथील महेश क्लबमध्ये आयोजित राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या २५ सेलपैकी १८ सेलच्या माध्यमातून निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांनी नियुक्तीपत्र दिले. बैठकीस राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, विठ्ठल चोपडे, बाळासाहेब देशमुख, अब्राहम आवळे, संतोष शेळके, आदींसह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी

२२०८२०२१-आयसीएच-०५

इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी ए.वाय. पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी मदन कारंडे, राजीव आवळे, विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Fly the NCP flag on Ichalkaranji Municipality