शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मजले ग्रामस्थ पाणीदार चळवळीसाठी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:18 AM

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले ...

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले (ता. हातकणंगले) गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. त्यामुळे डिसेंबर संपला की गावकऱ्यांची बेचैनी वाढू लागते. जानेवारीपासूनच पाण्यासाठी चारी दिशा भटकाव्या लागते. नागरिकांनी पाणी फौंडेशनच्या मदतीने शोधायचे ठरविले आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी गेले दोन महिने श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांचे पाय डोंगराकडे चालू लागले.कोल्हापूर जिल्हा तसा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो; पण हातकणंगलेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या कुशितील मजले गावाची परिस्थिती भीषण आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांमध्ये गावातील सर्व तलाव, बोअर, विहिरी तळ गाठतात आणि सुरू होते पाण्यासाठी पायपीट. या गावासह १४ गावांसाठी एकत्रित पाणी योजना पंचगंगा नदीतूून करण्यात आली आहे; परंतु त्याची अनियमितता नेहमीचीच असते. त्यामुळे पाण्यासाठी वणवण ही ठरलेलीच आहे. आजूबाजूची सर्व गावे पाण्यानी संपन्न आहेत; पण कोणत्या कारणाने या गावच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाचीे शासन दरबारी दखल घेतली जात नाही. शासनाच्या नाकर्तेपणाची चर्चा न करता गावातील तरुण वर्गाने एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे ठरविले. या तरुणांनी एकत्र येऊन पाणी फौंडेशनच्या उपक्रमाचा अभ्यास करून श्रमदानातून काम सुरू केले आहे.यानिमित्ताने युवा वर्ग एकत्र आला आणि अनेक बैठका करून काम तडीस नेण्याचे ठरविले. नियोजनानुसार गावच्या उत्तरेला असणाºया तब्बल १0२ हेक्टर डोंगराचा उपयोग करून घ्यावयाचे ठरविले. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी श्रमदानास सुरुवात केली. दरम्यान, यासाठी अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनचा अभ्यास दौरा केला. हिवरे बाजार, सातारा जिल्ह्यातील वेळू या गावांचा अभ्यास दौरा केला. डोंगरावर बंधारे बांधण्यास सुरुवात केली. छोटे-छोटे बंधारे त्याचबरोबर पाणी वाया जाऊ नये यासाठी दक्षता घेऊन काम सुरू आहे. यामुळे पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे.मदतीची आवश्यकता1 या गावातील कष्ट करणाºया ग्रामस्थांना आता आवश्यकता आहे ती मदतीची. कारण आता पावसाळ्यापूर्वी तालावातील गाळ काढणे आवश्यक असल्याने त्यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे. ते काम मनुष्याकरवी करणेही शक्य नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गावाके सुरू केलेल्या या कामास आर्थिक मदत करण्याची गरज आहे.2 पाणी फौंडेशनच्या माध्यमातून मजले गावातीलच, पण बाहेर नोकरी अथवा व्यवसाय करणाºया गावच्या व्यक्तींना देखील मदतीचे आवाहन केले आहेच. विशेष म्हणजे त्याला काहीअंशी यश देखील मिळत आहे; परंतु येणारा खर्च पाहता जिल्ह्यासह राज्यातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी मदत करावे, असे आवाहन गावकºयांनी केले आहे.