पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:23 IST2021-08-01T04:23:24+5:302021-08-01T04:23:24+5:30

जयसिंगपूर : महापुराने हातकणंगले तालुक्यातील शेती, जनावरे व घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून ...

Flood victims should get immediate compensation | पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी

पूरग्रस्तांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी

जयसिंगपूर : महापुराने हातकणंगले तालुक्यातील शेती, जनावरे व घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने यांनी दिले. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, चावरे, भेंडवडे, खोची, बुवाचे वाठार, हिंगणगाव, लाटवडे, घुणकी, भादोले या गावांना वारणेच्या महापुराने मोठा फटका बसतो. तसेच रांगोळी, हलोंडी, शिरोली, रुई, इंगळी ही गावे पंचगंगा नदीच्या पुरामुळे बाधित होतात. या गावांतील शेतीचे व घराचे तत्काळ पंचनामे करावेत, व्यापारी घटकांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये अनुदान मिळावे, शेतमजुरांनाही याचा आर्थिक लाभ व्हावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, नगरसेवक अरविंद माने, माजी आमदार अमल महाडिक, पृथ्वीराज यादव, सुहास राजमाने, आदी उपस्थित होते.

३१ जयसिंगपूर अशोकराव माने

फोटो-

महापुराने नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदत मिळावी, या मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे डॉ. अशोकराव माने, डॉ. नीता माने, आदी उपस्थित होते.

Web Title: Flood victims should get immediate compensation