शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरणात वाहतुकीबरोबर महापुराचाही विचार व्हावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:51 IST

असोसिएशन ऑफ आर्किटेक्टसची मागणी : मंत्री नितीन गडकरी यांना पत्र

कोल्हापूर : कोल्हापुरातून गेलेल्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, बास्केट ब्रीज व त्याचे पोहोच रस्ते करताना केवळ वाहतुकीचा विचार न करता शहरातील महापुराचा धोकाही लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी या सर्वांचेच बांधकाम व्हाया डक्ट पद्धतीने करा, अशी मागणी कोल्हापूर असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली. महामार्गावरील पुलांचे प्रस्तावित डिझाईन पुण्यातील ‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर' यांच्याकडून तपासून घ्यावे, असेही या पत्रात सुचविले आहे.पत्रात म्हटले आहे, पुणे-बंगळूरू महामार्गाचे सहापदरीकरण व त्यावरील पुलांच्या कामासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. मात्र, घाईगडबडीत निव्वळ रस्ते वाहतुकीसाठी पूल आणि पुलांचे पोहोच रस्त्यांचे बांधकाम न करता बदललेले पर्जन्यमान याचा विचार करून या पुलांच्या पोहोच रस्त्यांच्या अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या कोल्हापूर आणि शहर परिसरातील महापूर आपत्तीचाही विचार या पुलांचे डिझाईन करताना करणे आवश्यक आहे.

एकत्रित मॉडेलचा अभ्यास कराकोल्हापूरमध्ये २०१९, २०२१ व २०२३ मध्ये आलेला पूर, पाटबंधारे विभागाकडील पंचगंगा व कृष्ण नदीच्या महापूर संदर्भातील उपलब्ध रेकॉर्डचा आधार घ्या. पूल अस्तित्वात नसल्यास व असल्यास, पूल आणि पोहोच रस्ते यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती, व्हाया डक्ट पद्धतीचा अवलंब केल्यास होणारा परिणाम याचे एकत्रित मॉडेल तयार करून त्यावर अभ्यास करा व नंतर निर्णय घ्या, अशी मागणी या पत्रात केली आहे.

पुलाचे हायड्रॉलिक डिझाईन तपासून घ्याकोल्हापूर व सांगली येथील पुराची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना सुचविणे यासाठी नेमलेल्या वडनेरे समितीच्या अहवालातही अशा बांधकामांचे हायड्राॅलिक ऑडिट करावे अशी शिफारस केली आहे. त्यामुळे महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलांचे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेकडून डिझाईन तपासून घ्यावे, तोपर्यंत संबंधित पुलाचे किंवा पोहोच रस्त्यांचे बांधकाम करू नये, अशी मागणी करण्यात आली.

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, बास्केट ब्रीज व त्याचे पोहोच रस्ते करताना केवळ वाहतुकीचा विचार न करता महापुराचा धोकाही लक्षात घ्या. त्यासाठी या सर्वांचेच बांधकाम व्हाया डक्ट पद्धतीने करा अशी मागणी राज्य शासन, खासदार व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण संचालक यांच्याकडे केली आहे. मात्र, संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. - अजय कोराणे, अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गNitin Gadkariनितीन गडकरी