शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मानवतेचा पूर यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:00 IST

इंद्रजित देशमुख महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार ...

इंद्रजित देशमुखमहाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार आणि उद्ध्वस्त होणारी स्वप्नं बघून जीव अक्षरश: कातरला जातोय. या कातरण्यातच अनंत काहुरांची कधीच न संपणारी मालिका मनात विचारांचा डोंगर उभा करून जाते. पाऊस भयानक, पावसामुळे जीवनदायिनी असलेल्या नद्यांची दिसणारी रूपेही भयानक आणि या भयानक रूपातून निर्माण झालेला महापूरही भयानक आणि त्या भयानकतेमुळे जीवनात आलेलं केविलवाणेपण तर त्याहूनही भयानक, अशी आमची अवस्था झाली आहे. वास्तविक पाणी म्हणजे जीवन असतं ते आम्हाला जगवत असतं. पण आज हेच जगवणारं पाणी कितीतरी जणांचा जीवन संपवू पाहतंय. याचंच खूप वाईट वाटत आहे आणि मन खूप विषण्ण होत आहे. याच विषण्णतेत भर घालण्यासाठी म्हणून की काय कुठे कुठे महापुराच्या पाण्याबरोबर व्यापक न झालेली संकुचित मनंही पाहायला मिळत आहेत.वास्तविक जगातलं कुठलंही संकट इतकं गंभीर कधीच असू शकत नाही की जे आमचा धीर संपवेल; पण हा महापूर बघून आता मन खरोखरच घाबरायला लागलंय. भोवताली भग्न अवस्थेतील बांधकाम आणि विस्कटलेले संसार यामुळे होत्याचं न्हवतं झालेली कितीतरी चिन्हे आम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आता सगळंच गेलं. त्यामुळे जीवनातील नाउमेद वाढवणारी मनोवृत्ती तयार होत आहे, हे असं असलं तरी एखाद्या वावटळात दिवा लागावा त्याप्रमाणे आपलं स्वत:च तन-मन-धन अर्पण करून माणुसकीच्या महापुराचं दर्शन घडवणारं कुणी उभं राहतंय का आणि स्वत:सोबत इतरांनापूर काय येईल जाईलम्हणून का गळायचं।झटत झगडत जगूनाही गा पळायचं।परत उभं करू सारंमागं नाही वळायचं।धिटाई मनात धरूनाही चिंतेत जळायचं।हिंमतीनं ताकदीनं फुलवूसंसार आणि बांधू नवं घर।।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।जाईल महापूर दादा, नको सोडू धीर।।...असा धीर देत काही गोष्टीची मनं आतुरतेने वाट पाहत असत. तेवढ्यात आपल्या जवळचे दीदी आणि दादा पूर आणि पाण्यात उभं राहून इतरांचे संसार उभे करण्यासाठी धडपडत असल्याचं कळलं की डोळे आपोआप भरून येतात आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक भाव वाढीस लागतो. संपत्तीसंचयाच्या पलीकडे सुद्धा एक देखणं विश्व आहे आणि तेच विश्व या जगातील अंतिम सत्य आहे, याची आपोआप प्रचिती या लोकांचं काम बघून जाणवते.जीवनात संकटं तर येतच असतात, पण अशा संकटातसुद्धा एखादी संधी लपलेली असते आणि त्या संधीला शोधून तिचं सौंदर्यात परिवर्तन करायचं असतं; हे आम्हाला अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच कळतं म्हणूनच परत परत अशा आपत्तीग्रस्तांना मदत करू वाटते. मग ती कोणत्याही प्रकारे असुदे. त्यांना आपल्याकडून देता आलं तर धन द्यावं नाही जमलं तर मन द्यावं आणि तेही नाही जमलं तर निदान तन तरी द्यावं. धनाच्या बाबतीत कुणी चलन द्यावं म्हणजे आपत्तीग्रस्तांना सुसह्य स्थितीत जगता येईल. ज्यांना चलन जमणार नाही त्यांनी या आपत्तीग्रस्तांची मनोभावे सेवा करावी आणि ज्यांना सेवाही जमत नाही त्यांनी निदान माझ्या एका कवी मित्रानं म्हटल्याप्रमाणेआलेल्या या संकटात एकेजागी ºहाऊ।मिळालेला घास, तुकडा सांभाळून खाऊ।बुडवणारा पूर सगळे एकोप्याने पोहू।धिटाईने महापुरा ओसराया लावू।संकटात परसंगाला, तुला मी आधार आणिमला तू आधार।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।।असा निदान शब्दाचा आधार तरी द्यावा आणि तो मनापासून द्यावा. ही सगळी मदतीचीच रूपे आहेत. आपण ती अवलंबली तर आपल्यालाही समाधान लाभतं. कधीतरी आमच्या मनाला प्रश्न पडतो की हे आम्ही का करायचं तर त्याचं उत्तर एकच आहे की तर ते मानव्याच्या जोपासनेसाठी करायचं. एक तेजस्वी दिवा आपल्यासारखे हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो आणि जगातील अंधार कमी होऊ शकतो; त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत राहून अवघ्यांच्या जीवनातील अपूर्णांचा अंध:कार कमी करण्यासाठी हे करायचं. वास्तविक नदी गावात येत असताना गटारीचं आणि ओढ्याचं पाणी ज्या सहजतेने आपल्या प्रवाहात स्वीकारते; त्याच भावाने मंदिरातील मोरीतून येणारं तीर्थसुद्धा ती स्वीकारते. आमच्या जगण्यातसुद्धा ही सहजता यावी. आम्ही अशा या आपत्तीग्रस्तांसाठी खूप खूप मदत करावी आणि आमच्या प्रत्येकाच्या अंत:करणात मानवतेचा महापूर यावा आणि तो कधीही न ओसरणारा असावा, एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक वपरिवर्तनशील वक्ते आहेत)