शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात २७ ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा, उत्तर भारताशी कोल्हापूर जोडले जाणार

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 24, 2024 19:20 IST

धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध असल्याने कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे २७ ऑक्टोबर पासून कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात नियमित विमानसेवा सुरू होणार आहे. सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी ही सेवा सुरू राहणार असून कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उड्डाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचेल अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली.कोल्हापूरच्या विमानसेवेचा गतीने विस्तार होत असून कोल्हापूर- तिरूपती विमान सेवा सुरू झाली आहे. नागपूर, गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आता कोल्हापूरकरांची मागणी असलेली कोल्हापूर ते अहमदाबाद गुजरात थेट विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान, कोल्हापूर-अहमदाबाद-कोल्हापूर या मार्गावर उड्डाण करेल. खासदार धनंजय महाडिक यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या विमान सेवेमुळे अहमदाबाद सोबतच गुजरात, राजस्थानसह उत्तर भारताशी कोल्हापूर जोडले जाणार आहे. सध्या 'या' मार्गावर सुरु आहे विमानसेवा सध्या कोल्हापूर- बेंगलोर, कोल्हापूर - हैद्राबाद, कोल्हापूर- मुंबई, कोल्हापूर- तिरूपती या मार्गावर विमानसेवा सुरू असून त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर- अहमदाबाद गुजरात ही सेवा सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुरू राहणार असून, त्यासाठी तिकीटाचे बुकींग सुरू झाल्याचीही माहिती खासदार महाडिक यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरairplaneविमानGujaratगुजरात