शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Airport: अचानक विमान रद्द, प्रवाशांची गोची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 16:07 IST

एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून देशभरातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध असताना आता कोल्हापूर विमानतळावरील एका कंपनीची विमानसेवा अचानक वारंवार रद्द केली जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे विमान टेकऑफ करण्याच्या आधी दोन तास प्रवाशांना रद्दचा संदेश येत असल्याने प्रवाशांसह ट्रॅव्हल कंपन्यांची झोप उडाली आहे. एकाच महिन्यात हा प्रकार वारंवार घडल्याने या एअरलाइन्सची सेवाच बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-तिरुपती व कोल्हापूर-बंगळुरू या मार्गावर एका कंपनीकडून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला ही सेवा नियमितपणे सुरू असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या कंपनीने कोल्हापूर-तिरुपती, कोल्हापूर-मुंबई, बंगळुरू या मार्गावरील विमाने अचानक रद्द केल्याने प्रवाशांची चांगलीच गोची झाली.कोणत्याही वेळेस कुठलीही कल्पना न देता विमान रद्द केले जात आहे. केवळ एका एसएमएसद्वारे प्रवाशांना दोन तास आधी याची कल्पना देऊन संबंधित कंपनी आपल्या अनागोंदी कारभाराचे वारंवार दर्शन घडवीत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.ट्रॅव्हल कंपन्यांना त्रासकोल्हापुरातील ट्रॅव्हल कंपन्यांमार्फत अनेक नागरिक पर्यटनासाठी जगभर जातात. दोन दिवसांपूर्वी एका ट्रॅव्हल कंपनीने तिरुपतीसाठी २१ प्रवाशांचे तिकीट काढले होते. मात्र, या मार्गावरील विमान अचानक रद्द करण्यात आल्याने ट्रॅव्हल कंपनीची झोप उडाली. कोल्हापूर-मुंबई ही सेवा एखाद्या चांगल्या एअरलाइन्सला द्यावी, अशी मागणी कोल्हापूर ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळairplaneविमान